Top Post Ad

वसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक

वसई-विरार महापालिकेने केले ओला -सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक


वसई :
अविघटनशील कचरा (न कुजनारा कचरा) व (कुजणारा) विघटनशील कचरा, सुका कचरा असे कचऱ्याचे वर्गीकरण करून पालिके मार्फत कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये ते द्यायचे आहेत.  शहरांतील सर्व प्रकारच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे सुचविल्यामुळे आता नागरी गृहनिर्माण संस्थाना देखील स्वतंत्रपणे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच संस्था किंवा वाणिज्य अस्थपना कोणीही अशा ओला व सुका आदी कचऱ्याचे वर्गीकरण करून देणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंबहुना अशा कच-याची स्वतंत्रपणे व्यवस्थापन व वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात पाच टक्के सूट देण्यात येणार असल्याचे वसई विरार महानगरपालिका मार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांनी केंद्र शासनाच्या अधिसूचना 2016 अर्थात घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची पालिका क्षेत्रात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागास दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी दिली आहे.  जमा ओला व सुका कचरा वेगळे करून कुंडीत व पालिकेच्या वाहनांना देणे बंधनकारक आहे. ओला कचरा/ कुजणारा कचरा/बुरशीं थींश (हिरवा कचरा कुंडी)किचनमधून निघणारा कचरा-खराब अन्न, चहापत्ती, फळे, भाज्या, मांस-हाड, अंड्याचे कवच इत्यादी., बागेत गवत, पालापाचोळा,फुल इत्यादी. सुका कचरा/न कुजणारा कचरा/की थींश(निळी कचरा कुंडी): वृत्तपत्र,रद्दी पेपर, धातूचे वस्तू, वायर, रबर, सर्वप्रकारचे प्लास्टिक, कापडी चिंध्या, लेदर, रेगझिन,दूड फर्निचर,पॅकेजिंग मटेरियल. घरगुती घातक कचरा/ऊोशीींळल करूरी: थींश(लाल कचरा कुंडी):


सर्व प्रकारचे स्प्रे बॉटल्स, बॅटरी, ब्लीचींग, फिनेल, इत्यादी कंटेनर, कार बॅटरी, ऑईल फिल्टर्स, कार केअर प्रॉडक्ट, केमिकल्स, सॉल्वेंट इत्यादी कंटेनर, कॉस्मेटिक वस्तू, जंतुनाशक इ.कंटेनर, पेंट, ऑईल, लुब्रीकेंट, ग्लु, थिनर, इत्यादी केमिकल व कंटेनर, स्टायरोफोक आणि सॉफ्ट फोम पॅकेजिंग मटेरिअल, फुटलेले थर्मामीटर व मयुरी असलेले इत्यादी प्रोडक्ट, काल बाह्य औषधे, डिस्पोजेबल सिरींज. 100 किलो पेक्षा जास्त कचरा ; तर तयार करा खत तसेच ज्या गृहनिर्माण संस्था अथवा खाजगी संस्था पासून प्रतिदिन 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्यास अशा बल्क वेस्ट जनरेटर्सना घनकचरा व्यवस्थापन 2016 अधिनियमाअंतर्गत ओल्या कचऱ्यापासून जागीच खत निर्माण करणे किंवा बायोगॅस प्लांट उभारणे इत्यादी सारखे प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com