Top Post Ad

कोरोनील प्रकरणी रामदेव यांच्या पतंजलीला दहा लाखाचा दंड

कोरोनील प्रकरणी रामदेव यांच्या पतंजलीला दहा लाखाचा दंड

 


 

नवी दिल्ली

 

रामदेव यांची कंपनी पतंजली ही लोकांच्या मनातील भीतीची फायदा घेत हे औषध बाजारात आणले आहे. त्यामुळे लोकांना हे औषध कोरोनावरील औषध असल्याचे वाटतेय. पतंजलीने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे औषध बाजारात आणले. या औषधावरून मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे.  खरं तर हे औषध फक्त ताप, सर्दी, खोकला यावरचे आहे. असे न्यायालयाने सांगत पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

चेन्नईतील अद्यार इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पतंजली विरोधात याचिका दाखल केली आहे. या कंपनीचा कोरोनील या नावाने ट्रेडमार्क 2027 सालापर्यंतसाठी रजिस्टर आहे. पतंजलीने या नावाने औषध बाजारात आणताना ते नाव रजिस्टर आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते असे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने पतंजलीला कोरोनील हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत.सोबतच पतंजलीने अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट योग अॅण्ड मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ला पाच पाच लाख रुपये प्रत्येक देण्याचे आदेश न्यायालयाने पतंजलीला दिले आहेत.





 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1