Top Post Ad

कोकणातील हेदली गावच्या ग्रामस्थांनी दिला समतेचा संदेश

कोकणातील हेदली गावच्या ग्रामस्थांनी दिला समतेचा संदेश


ठाणे
रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातील हेदली गाव पुरोगामी चळवळीचा केंद्र बिंदू समजला जातो. या गावात नेहमी सामाजिक परिवर्तनशील विचारचे उगम होत असते. या हेदली गावात गणेशउत्सवादरम्यान सुरु असलेल्या समेतचा संदेश देणारी आरतीमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.  पुरोगामी विचार घेऊन चालणारे गाव म्हणून या गावाची ओळख आहे  येई ओ विठ्ठले माझे माऊली  ये  या चाळीवर समतेची आरतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.  ही आरती गावातील सर्वाच्या तोंड पाठ झाली आहे.या आरतीमधून पर्यावरण रक्षणचा  संदेश दिला आहे.समाजामध्ये मानवतेने व बंधुभावाने राहण्याचा संदेश यातून दिला जातो.  जातीपाती विसरुन जाऊ या असा संदेश तसेच जनमानसांत समानतेचा संदेश या  माध्यामातून दिला आहे. विशेष म्हणजे ही आरती बच्चे कंपनीच्या आवडीची असलेली आरती यावेळी मुख्य केंद्र बिंदू ठरत आहेत.


 आपली संस्कृती परंपरा या पर्यावरण रक्षण ,समाज बांधीलकी टिकावी हा या आरतीचा मुख्य हेतू आहे.  उत्सवात मनोरंजन व कोकणची लोककला म्हणजे जाखडी नृत्य. या कलेतून शाहिर सचिन गोवळकर हे समाज प्रबोधन गिते गाऊन प्रबोधन करतात. त्यामुळे महापुरुषाचे विचार आज घरोघरी रुजू लागले आहेत. त्यामुळे समाज प्रबोधन होत असल्यामुळे गावात परिवर्तन दिसत आहे. मंडळाचे अध्यक्ष संदिप गोवळकर व त्यांचे कार्यकर्ते हे समाज प्रबोधन करत असताना आरती समतेची माध्यमातून केवळ समाज प्रबोधन नव्हेतर उत्सव काळात निर्माल्य नदी पात्रात टाकून पाणी प्रदूषण होत असते हे पटवून देण्यात आले. प्रदुषण मुक्त उत्सव साजरा करता येईल यांचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे अभिनव उपक्रमाची चर्चा व कौतुक सर्व स्थरातुन होत आहे.


आरती समतेची
(चाल :येई वो विठ्ठले माझे माऊली ये )
यारे या जन सारे,आरती समतेची गाऊ
शिकवण बंधूत्वाची  SS आपुल्या मनोमनी रुजवू  || धृ ||
देश आमुचा विविधतेने जगात हा नटला
नाना रंगी फुले उमलली बाग जणू फुलला
देश उन्नतीसाठी SS सारे एकजूट होऊ             ||  1 ||
संत महात्मे या धरतीवर जन्माला आले
मानवतेचा मंत्र देऊनी अमरपदी गेले
विसरुन जाती पाती SS बंधूभावाने राहू           || 2  ||
थोराची वाचूनी चरित्रे मन आपुले घडते
अतुट  नाते समाज जिवनासवे इथे जडते
समतेचा शांतीचा SS   झेंडा चहुकडे मिरवू       ||  3 ||
विकसित होई विवेकबुध्दी विद्यार्जन करीता
ज्ञानासंगे कर्तत्वाचे पाऊल ही पडता
धडा सहजिवनाचा   विद्यामंदिरत गिरवू            ||  4 ||
उच्च कुळी जन्माला म्हणून का थोर कुणी ठरतो
विचार करणी आचारणाने जगी अमर होतो
समाजसेवेसाठी   सारे सज्ज आता होऊ        || 5  ||


(अधिक  माहितीसाठी- 9969045602)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com