आरोग्य हेच खरे स्वातंत्र्य' मोहीम

७५०एडीची 'आरोग्य हेच खरे स्वातंत्र्य' मोहीममुंबई


आरोग्य सेवेचे विविध पैलू एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणा-या ७५०एडी हेल्थकेअरने 'आरोग्य हेच खरे स्वातंत्र्य: स्वातंत्र्यता दिवस मालिका' मोहिमेच्या माध्यमातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. यात शारीरिक, मानसिक आणि वैयक्तिक आरोग्याच्या महत्त्वाबद्धल जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.या साप्ताहिक मोहिमेत आरोग्यसेवा व्यावसायिक, फार्मासिस्ट्स, न्युट्रिशनिस्ट्स, आर्ट ऑफ लिव्हिंग तज्ञ आणि रुग्ण, ब्लॉगर आणि उद्योजक यांच्यामार्फत संपूर्ण आरोग्य व हॉस्पिटल/डॉक्टरांच्या अहवालाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लाईव्ह सिरीज, मुलाखतीद्वारे संवादावर भर देण्यात आला. ७५०एडी हेल्थकेअरने योगाच्या योग्य पद्धती, भारतातील आरोग्य सेवेची स्थिती, विविध प्रकारचे स्वातंत्र्य आदी विषयांवर मान्यवर पॅनेलीस्टची लाईव्ह चर्चासत्रे आयोजित केली.


या मोहिमेमागील हेतू विशद करताना ७५०एडी हेल्थकेअरच्या संस्थापक शबनम खान म्हणाल्या, “आम्हाला चांगले आरोग्य आणि देशातील आरोग्य सेवा सुविधांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत साकारेल. या मोहिमेतील चर्चांमध्ये आरोग्यसेवेतील विविध समस्या, शारीरिक आणि भावनिक परिवर्तन तसेच यावरील उपाय या विषयांवर भर दिला गेला. आम्ही २० पेक्षा जास्त प्रसिद्ध आणि पुरस्कारप्राप्त पॅनलिस्टसोबत विशेष मुलाखती आणि लाइव्ह चर्चा घेतल्या. त्यांनी ट्रान्सफॉर्मेटिव्ह आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यास मदत केली आहे.”


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या