Top Post Ad

सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलांचा 'शॉक', न्याय मिळवून देण्याचा मनसेचा निर्धार

सर्वसामान्यांना वाढीव वीज बिलांचा 'शॉक', न्याय मिळवून देण्याचा मनसेचा निर्धार



उरण


लॉकडाऊन मधील वीज देयकां वरील वहन आकार, वीज शुल्क आकार माफ करणे, कोरोना सदृश्य परिस्थिती नियंत्रण मध्ये येईपर्यंत वीज दर वाढीला स्थगिती देणे, लॉक डाऊन काळात वीजबिला बाबत योग्य तो तोडगा काढने.आदी वीज समस्याच्या मागणी बाबत ग्राहकाचे हित जोपासत  मनसे ने याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल शेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत समस्या सोडविण्याबाबत चर्चा विनिमय करून विजेच्या संबंधित विविध समस्या त्वरित सोडवाव्यात व जनतेला दिलासा देण्यात यावा याबाबत मनसेतर्फे चोंडे यांना निवेदन देण्यात आले.


लॉकडाऊन कालावधी मध्ये आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात व जनतेच्या वाढत चाललेल्या तक्रारी लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांची भेट घेतली. निवेदन देऊन विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यासह उरण तालुका सचिव जयंत गांगण, तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत, राकेश भोईर, विभाग अध्यक्ष वैभव भगत, चंद्रकांत भगत, चंद्रकांत गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी लॉक डाऊन कालावधीत वीज देयकावरील वहन कर, वीज शुल्क आकार माफ करावा, कोरोना रोगाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत वीज दरवाढीला स्थगिती द्यावी, वीजबिलावर योग्य तो तोडगा काढावा.तोपर्यंत देयकाची रक्कम न भरलेल्या ग्राहकांची विद्युत जोडणी खंडित करू नये.आदी विविध मागण्या यावेळी मनसेतर्फे करण्यात आल्या. यावेळी मनसेतर्फे करण्यात आलेल्या विविध मागण्यांचा व लेखी निवेदनाचा विचार करत सकारात्मक प्रतिसाद देत आपण या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू व पुढेही वरिष्ठांपर्यंत याचा पाठपुरावा करू असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांनी मनसेच्या शिष्ट मंडळाला दिले. मात्र समस्या सुटल्या नाहीत तर मनसे आपल्या स्टाईलने जनतेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही मनसेतर्फे यावेळी देण्यात आला. दरम्यान कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळ संकटातही धैर्याने  व जिद्दिने काम करणाऱ्या महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कोरोना योद्धा म्हणून मनसे तर्फे कौतुकही करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com