स्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थानी प्रस्ताव सादर करावेत
ठाणे
महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना या जाहिरातीव्दारे कळविण्यात येते की, स्वाधार योजना राबवू इच्छीणाऱ्या व राबवित असलेल्या सर्व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबंधित जिल्हयाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करावेत.
स्वाधार योजनेकरिता अटी व शर्ती :
संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असावी, संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान ५ वर्ष कामांचा अनुभव असावा.संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असावी.संस्थेच्या नावे किमान 15लक्ष इतकी रक्कम बॅकेत मुदत ठेव म्हणुन असणे आवश्यक आहे.योजना राबविण्याकरिता इच्छुक संस्था त्याच जिल्हयातील असावी.संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी. निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्यास संस्थेचेअर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
संस्थेकडे योजनेच्या निकषानुसार कर्मचारी वर्ग असावा, योजना राबविण्याचे निकष दिनांक २३.३.२०१८ च्या शासन निर्णयानुसार असावेत.प्रत्येक स्वाधारगृहाची क्षमता ३० लाभार्थ्यांकरीता राहील परंतु मोठया शहरांमध्ये तो ५० किवा १०० पर्यंत वाढविता येईल या बाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील.
स्वाधार योजनेच्या प्रस्तावासोबत दयावयाच्या कागदपत्रांसाठी (प्रपत्र अ)आपल्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास दिनांक 31 ऑगस्ट 2020 पुर्वी संपर्क साधून कागद पत्रासाठीची प्रपत्र.अ ची यादी प्राप्त करून घ्यावी. परिपूर्ण प्रस्ताव दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करावा.सुधारीत स्वाधार योजनेचा दिनांक २३/३/२०१८ चा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ठाणे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या