Top Post Ad

लवकरच शाळांची घंटा वाजणार....

लवकरच शाळांची घंटा वाजणार....



कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी सर्व उद्योगधंदे तसेच शाळा महाविद्यालही बंद होते. मागील महिन्यापासून शाळा कधी सुरु होणार  या विवंचनेत पालकवर्ग होता.  ऑगस्ट महिन्यात शाळा सुरु होण्याच्या  दृष्टीने सुरुवातही झाली होती. मात्र संक्रमण वाढीचा वेग कायम राहिल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता सप्टेंबरमध्ये शाळा सुरु करण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतची चाचपणीही झाली आहे. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा  गायकवाड - गोडसे यांनी दिली. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये ऑगस्टपासूनच शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या शाळा सुरू केल्या जाणार होत्या. परंतु, राज्यात पावसाचा जोर वाढल्याने येत्या काही दिवसांनंतर या शाळा सुरू केल्या जातील असेही त्या म्हणाल्या.


राज्यात १५ जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नसल्या तरी अनेक शाळा संस्थानिकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र  यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणीना सामोरे जाे लागत आहे.ई-शैक्षणिक साधनांच्या  अभावामुळे त्यांना हे शिक्षण घेता  येत नाही. तसेच ई-शिक्षणाला अनेकांची मनापासून तयारी नाही. हातात पेन, पेन्सिल असली तरी शाळा भरल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये थेट शाळा सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले. आता कोरोना स्थिती सुधारतेय विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने या पट्टयांतील शाळा सुरू करण्यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, केंद्र सरकारने आक्षेप घेतल्याने आम्हाला त्या थांबवाव्या लागल्या होत्या. मात्र, आता राज्यातील अनेक भागात परिस्थिती सुधारत असल्याने आम्ही या शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शाळा आता सुरू केल्या नाहीत, तर पालकांना शैक्षणिक वर्ष ड्रॉप होईल की काय, अशी चिंता वाटू लागली आहे. विद्यार्थी एक वर्ष मागे राहील. त्यावर नाहक खर्च करण्याची वेळ येईल, या चिंतेने पालकांची झोप उडाली आहे. तसेच विद्यार्थीसंख्या घटण्याची भीती शासनाला वाटत आहे. परिणामी शालेय शिक्षण विभागाने सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे. राज्यातील शाळांची सुरुवात टप्प्याटप्प्याने आणि स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन केली जाणार आहे. तर आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळा तातडीने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विदर्भातील शाळा या सर्वात उशिराने सुरू होतात. त्या काळात या भागात खूप ऊन असल्याने शिक्षण विभागाकडून निर्णय घेतला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच कोरोनामुळे विदर्भातील काही ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com