ठाणे
ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी संदिप माळवी यांनी बनावट/खोटे कागदपत्र दाखल करून ठामपाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी सुभाष ठोंबरे यांनी नौपाडा पोलिस स्टेशन येथे पुराव्यासह तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार नौपाडा पोलिसांनी ठामपाकडे ११ जुन २०१८ रोजी व नंतरही माळवी यांच्या बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली होती. परंतु ठामपाने पोलिसांना कोणतीही कागदपत्रे दिली नव्हती, नौपाडा पोलिसांच्या सदरील पत्रांची व त्यानुसार ठामपाने केलेल्या कार्यवाहीबाबतची सुभाष ठोंबरे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करुन ठामपाकडे माहितीची मागणी केली होती.
ठामपा आस्थापना अधिक्षक तथा जन माहिती अधिकारी श्रीमती रश्मी गायकवाड यांनी व ठामपा कार्मिक अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी श्रीमती वर्षा दिक्षित यांनी चुकीचे कारण पुढे करून ठोंबरे यांना माहिती देण्याचे नाकारले म्हणून ठोंबरे यांनी द्वितीय अपील दाखल केले होते. जन माहिती अधिकारी यांनी नमूद केले की, दिनांक २२ ऑ्क्टोबर २०१८ रोजी वैयक्तिक माहिती म्हणून नाकारलेली आहे. ही माहिती वैयक्तिक माहितीमध्ये बसत नाही. अपिलार्थी यांच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या माहिती अर्जाला अनुसरून तत्कालिन जन माहिती अधिकारी यांनी चुकीचे कारण देवून माहिती नाकारली आहे.
यास्तव आयोगाने पुढील आदेश दिले आहेत.
१. विद्यमान जन माहिती अधिकारी श्रीमती रश्मी गायकवाड, आस्थापना अधिक्षक, ठाणे महानगरपालिका यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम ७ (६) या मधील तरतुदीच्या अनुषंगाने, अपिलार्थीस उपलब्ध माहिती १५ दिवसात नोंदणीकृत डाकेने नि:शुल्क पुरवायची. जी माहिती उपलब्ध नाही त्याबाबत मुद्रनिहाय स्पष्ट व विविक्षित उत्तर अपिलार्थी यांना १५ दिवसांत पाठवावे
२. तत्कालिन जन माहिती अधिकारी श्रीमती रश्मी गायकवाड, आस्थापना अधिक्षक, ठाणे महानगरपालिका यांनी अपिलार्थी यांच्या दिनांक २५/९/२०१८ रोजीच्या माहिती अर्जाला अनुसरून चुकीचे कारण देऊन माहिती नाकारली आहे. म्हणून त्यांचेविरुध्द माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत २० अन्वये शास्तीची कार्यवाही का करण्यात येऊ नये, याचा लेखी वुलासा ३० दिवसांत त्यांनी आयोगाकडे सादर कराया. अन्यथा, त्यांचे काहीही म्हणजे नाही असे गृहीत धरून शास्तीचे आदेश कायम केले जाऊ शकतील.याची नोंद घ्यावी.
३. तत्कालीन प्रथम अपीलीय प्राधिकारी श्रीमती वर्षा दिक्षित, कार्मिक अधिकारी ठाणे महानगर पालिका यांनी अपीलार्थी याना दिनांक २०/११/२०१८ अन्याये दाखल केलेल्या प्रथम अपिलावर सुनावणि घेऊन चुकीचे कारण देऊन अपिल निकाली काढले आहे. त्यामुळे त्यांचेविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शासन परिपत्रक क.के.मा अर्ज-२००७//प्र.क्र.१५४/08/of. दि.३१/०३/२००८ नुसार शिस्तभंगाविषयक कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येऊ नये, याबाबतचा लेखी खुलासा त्यांनी हा आदेश मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत आयोगासमोर सादर करावा. सदर मुदतीत लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास त्यांचे प्रस्तुत प्रकरणी-काहीही-म्हणणे नाही, असे गृहित परून शिस्तभंगाविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्याबाबत आदेश कायम करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.
0 टिप्पण्या