अखेर एस.टी.ला हिरवा कंदील, दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासालाही परवानगी

अखेर एस.टी.ला हिरवा कंदीलमुंबई


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील टाळेबंदीमुळे राज्यातील एसटीची सेवा देखील २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आली. ठराविक सेवेकरिता २२ मे पासून राज्यातील रेड आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या वाहतूकीकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. अतिशय अल्पसेवेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि राज्यभरातून होत असलेली मागणी  लक्षात घेता २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


 सर्वसामान्य नागरिकांना विशेष करून  ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवासाचे प्रमुख साधन एसटी आहे. एसटीच बंद असल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांवर आवलंबून रहावे लागते. यामुळे प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती दिल्या जात आहेत. त्यानुसार राज्यातील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरत होती.  शिवाय एसटीला हजारो कोटींचा फटका बसला होता. लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगार व मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्यासाठी, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी, ऊसतोड कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी धावत होती.


आता ती सर्वांसाठीच धावणार आहे. राज्य सरकारनं एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.  एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे,' असं परब म्हणाले


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या