विश्व वारकरी सेनेचा सरकारला इशारा ; प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार !विश्व वारकरी सेनेचा सरकारला इशारा ; प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार !अकोला 


विश्व वारकरी सेनेचे चार जिल्ह्याचे पदाधिकारी यांचे 31 ऑगस्टच्या आंदोलनाविषयी मीटिंग व पत्रकार परिषद पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते.   महाराष्ट्रभर विविध प्रतिष्ठान व ईतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. परंतु वारकऱ्यांना मात्र भजन व मंदिर प्रवेशापासून दुर ठेवण्यात आले आहे. त्या विरोधात ३१ ऑगस्टला ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत विश्व वारकरी सेनेतर्फे एक लाख वारकऱ्यांना घेउन पंढरपूर येथे मंदिर प्रवेश करुन लॉकडाउन मान्य नसल्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी विश्व वारकरी सेनेतर्फे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करण्यात आली की, आपणास वारकर्‍यांविषयी जिव्हाळा असेल, तर सन्मानाने विश्व वारकरी सेना पदाधिकारी ज्या वारकरी संघटनेने पाठिंबा दिला. त्या संघटनेचे एक महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर या सर्व मंडळींना आदराने निमंत्रित करून वारकऱ्यांच्या मागणीवर गांभीर्याने मुख्यमंत्री साहेबांनी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा ३१ तारखेचे आंदोलन आपण पाहून घ्यावे.


यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते विश्व वारकरी सेनेच्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा नारळ, दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला सभेला ह भ प विठ्ठल महाराज साबळे विश्व वारकरी सेना विदर्भ अध्यक्ष, ह भ प प्रविण महाराज कुलट स्वरसम्राज्ञ युवा ईश्वर कधी सेना अकोला जिल्हा अध्यक्ष, ह भ प राम महाराज गवारे युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा अध्यक्ष, ह भ प कृष्णा महाराज पाटील युवा विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, ह भ प वेदांत महाराज मुंदाने स्वरसम्राज्ञी युवा विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हा उपाध्यक्ष, केदारनाथ महाराज सरनाईक, रामेश्वर महाराज पाटील युवा विश्व वारकरी सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष व चारही जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष यांच्या सोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जि प अध्यक्ष सौ प्रतिभाताई भोजने, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सभापती सुशांत बोर्डे, कृषी सभापती वढाळ, डॉ प्रसन्नजीत गवई, दिपक गवई उपस्थित होते.
 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या