अयोध्येत राम मंदिराचे पूजनातून पुजारीही सुटू शकले नाहीत
मुंबई:
देशभरातील मंदिरे बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारचाच होता. काही राज्यातील मंदिरे उघडली त्याचे परिणाम सर्वांनी पाहिलेच आहेत. अयोध्येत राम मंदिराचे पूजन होण्यापूर्वी आणि नंतर अनेकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. त्यातून पुजारीही सुटू शकले नाहीत. तिरुपती बालाजीचे मंदिर उघडल्यानंतर तिथे काय परिस्थिती उद्भवली हे तुम्हाला माहीतच आहे, असे सांगतानाच आम्हीही देवभक्त आहोत. देऊळ बंद करणे आम्हालाही आवडत नाही. मंदिराचे सुद्धा एक अर्थकारण आहे. अनेक कुटुंबांची त्यावर उपजीविका अवलंबून असल्यामुळे मंदिरे बंद राहणे आम्हालाही आवडत नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी असल्याचा टोलाही त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
मंदिरे सुरू व्हावीत म्हणून देवासाठी आम्ही झगडत आहोत. कारण मंदिराचेही एक अर्थकारण आहे. अनेक कुटुंब मंदिराच्या अर्थकारणावर जगत आहेत. मंदिरापरिसरातील अनेक दुकाने सुरू असतात, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. पण मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. राजकारणाचा नसल्याचे सांगतानाच मंदिरे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपानं काल शिवसेनेच्या विरोधात घंटानाद आंदोलन केलं होतं. त्याच आंदोलनाला आज ३० ऑगस्ट रोजी राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.. भाजपाने ल घंटा वाजवली असेल, पण घंटा वाजवण्याआधीच ही सगळी वेदना आमच्या कानापर्यंत आणि हृदयात पोहोचलेली आहे, असेहीराऊत म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असं करावंसं वाटणार नाही. हे संकट माणसानं आणलेलं नाही, ही देवाची करणी आहे. देवासाठी आम्ही झगडतोय, आम्हालाही वाटतं मंदिरं उघडावीत. मंदिरांचं सुद्धा एक अर्थकारण आहे. मंदिरांवरसुद्धा लाखो कुटुंब जगतायत. देवळात पूजारी असले तरी प्रसादापासून हार, फुलं आणि नारळ अशा अनेक गोष्टींचा पुरवठा होत असतो. मंदिरांच्या बाहेर जे हार-फुलांचे स्टॉल असतात त्यांची आर्थिक उलाढाल थांबली आहे हे आम्हालाही माहीत आहे. या भूतलावरचं प्रत्येक क्षेत्र हे उदरनिर्वाहाचं साधन आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
0 टिप्पण्या