Top Post Ad

संभाजी बीडी प्रकरणी १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन

संभाजी बीडी प्रकरणी १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन 

 


 

छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती, लेखन, संपूर्ण जगाला माहिती आहे. असं असताना जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने बिडी उत्पादन होतं असून या बिडीवर महाराजांचे नाव असून त्याची विक्री केली जात आहे. तो कागद फाडून फेकला जातो. मागील ८० वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने महाराष्ट्रात धूम्रपान उत्पादन केले जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होतं आहे, हा अवमान यापुढे सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून निर्मिती करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. या संबंधीत कंपनीने नाव जर बदलले नाही तर १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देण्यात आला आहे.बिडीला संभाजी महाराजांचं नाव देणं आणि त्याची विक्री करणं हा संभाजी महाराजांचा अपमान असल्याने संभाजी बिडीचे नाव आता तात्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे. 
 




 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com