Trending

6/recent/ticker-posts

कळवा आणि मुंब्य्रातील कोवीड केअर सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण

कळवा आणि मुंब्यात 1100 बेडचे कोवीड केअर सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण


ठाणे


 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने तयार केलेल्या कळवा आणि मुंब्यात 1100 बेडचे कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना या रुग्णालयाचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.  आता रुग्णांना बेड मिळणार नाही, अशी तक्रार देखील येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. .कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अनुषंगाने  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याकरिता ते आज ठाण्यात आले होते.सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वाना धन्यवाद देतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले..  मागील काही दिवसात मुंबई आणि मुंबईजवळील एमएमआरडी क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वानी अंत्यत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला करायला सुरवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झालेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


ठामपाच्या  कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे,प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.


यावेळी ते पुढे म्हणाले,  इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाईगडबड केली आहे. परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नाही. एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल  ठाणे, कल्याण, नवीमुंबई येथील महापालिकांना महत्वाच्या सुचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार कोरोना रोखण्यात जरी कौतुकाची थाप मिळत असेल तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शुन्यपर्यत आणायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  कल्याण डोंबिवलीत जरी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यानुसार पुढील 20 ते 25 दिवसात यात नक्कीच बदल दिसून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर खाजगी रुग्णालयात आजही जर लुट होत असेल तर तक्रार करा, त्या तक्रारीची नक्कीच दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.  


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळयांच्या मेहनतीचे यश दिसते आहे. यंत्रणांनी  आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. मिशन बिगिन अगेनमध्ये आपण सुरुवात करीत आहेत.  त्यासाठी निर्जंतुकीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्यात यावा. जनजागृती करतांना   स्वत:च डॉक्टर न बनता अधिकृत डॉक्टरांवर विश्वास ठेवावा यावर भार द्यावा असे सांगितले. 


पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही.  अदृश्य शत्रूशी आपली लढाई सुरु आहे.  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले असून ते 1:20 प्रमाण केले आहे.  फिव्हर क्लिनिक, मोबईल क्लिनिक, जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत.  रुग्ण वाहिकांच्या संख्या वाढविण्यात आल्या आहेत, टेस्टची संख्या वाढविण्यात आल्या आहेत, जिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या आहेत.  एमएमआर मध्ये मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.  या सुविधांच्या गुणवत्ता व दर्जायावर भर देण्यात आलेला आहे.  त्यामुळे नागरिकांची पसंती मिळते आहे.  असेही ते म्हणाले. 


गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तळगाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खुप महत्त्वाचे काम केले आहे.  मुंब्रा विभागात कोरोनाचे काम खुप चांगले झाले आहे.  त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.  कळव्यामध्ये सुसज्ज सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे.  मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे मुंबई व ठाणे विभागात कोरोना नियंत्रणात आला आहे.  कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. .पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली मनपाला ९, उल्हासनगर मनपाला ८, अंबरनाथ न.प.ला  ५ आणि कुळगाव-बदलापूर न.प.ला ५ रुग्णवाहिका सुपुर्त करण्यात आल्या.  या रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.


Post a Comment

0 Comments