प्रौढ मुकबधीर मुलांकरीता विविध व्यवसाय प्रशिक्षण
ठाणे
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रौढ मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दयावयाचे आहे. त्याकरीता प्रवेश अर्जाचे वाटप कामकाजाचे दिवशी शासकीय सुटया वगळुन कार्यालयीन वेळेत शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षण केंद्र, शांती भवन, निजधाम आश्रम समोर, तहसिल कार्यालयाजवळ, गांधीरोड -५, उल्हासनगर, जि. ठाणे या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. टपालाने अर्ज मागवावयाचे असल्यास वरील पत्त्यावर रु.१०/- चे पोष्टाचे तिकीट लावलेले व स्वत:चा संपुर्ण पत्ता असलेला (पिनकोडसह) लिफाफा पाठवावा. अर्ज व्यक्तिशः किंवा टपालादवारे दिले जातील.अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत दि. १० सप्टेबर २०२० पर्यंत राहील.अधिक माहितीसाठी या भ्रमणध्वनी क्रमांक - ९०२१७७९७६४, ८६०००११४८९, ९२८४९३७८१३, ७५०७३९६९०५ संपर्क करावा असे आवाहन अधिक्षक शासकीय प्रौढ मूकबधिर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर यांनी केले आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे अंतर्गत असलेल्या शासकीय प्रौढ मुकबधीर प्रशिक्षण केंद्र उल्हासनगर-५, जि. ठाणे या संस्थेत १६ ते ४५ वर्ष या वयोगटातील इयत्ता ६ वी (वरीष्ठ) उत्तीर्ण, कोणताही गंभीर आजार नसलेले व जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे वैदयकीय प्रमाणपत्र किमाण ४० टक्के कर्णबधीर असलेल्या मुलांना औदयोगिक प्रशिक्षण केंद्राचे धर्तीवर जोडारी, सुतारकाम, तारतंत्री या एक वर्षीय प्रशिक्षण विभागांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क वगळता निवास,भोजन व शैक्षणिक साहित्य विनामुल्य पुरविणेत येते.
माजी सैनिक/विधवा व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
ठाणे
सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०१९ २०२० मध्ये शालांत परिक्षा (इ.१० वी), उच्च माध्यमिक परिक्षा (इ. १२ वी) परिक्षेमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होवून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेत व ज्यांचे पाल्य पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापिठात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळावा आहे,
तसेच राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इ. क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अर्ज मिळणेकरीता माजी सैनिकांनी स्वत:च्या Email वरुन या कार्यालयाच्या Email ID :
ben.zswothanc@gmail.com वर संपर्क करावा. जेणेकरुन त्यांना ईमेलद्वारे अर्ज पाठविण्यात येईल. तरी पात्रता धारक लाभार्थीनी गौरव पुरस्कार मिळणे बाबतचे अर्ज दि. १५ सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यालयात सादर करावेत, अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्र. ०२२-२५३४३१७४ वर संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या