राजगृह प्रकरणी ठाणे मार्गे पलायन करणाऱ्या आरोपीला कल्याण येथून अटक

राजगृह प्रकरणी मुंबई, ठाणे मार्गे पलायन करणाऱ्या आरोपीला कल्याण येथून अटक


मुंबई:


 राजगह परिसरातील तोडफोड केल्याप्रकरणी मुख्य आरोपी काही दिवसापूर्वी ठाणे मार्गे भिवंडीला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याला कैद करण्यात आले होते. याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून माटुंगा पोलिसांनी त्याला कल्याण येथून अटक केली आहे. विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या (वय 20) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो कल्याण येथील रहिवासी आहे.


यापूर्वी याप्रकरणी उमेश जाधव (35) याला माटुंगा पोलिसांनी 9 जुलै रोजी अटक केली होती; मात्र तोडफोड करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला नसल्याने त्याचा शोध सुरू होता. सीसी टीव्ही फुटेज आणि सह-आरोपी उमेश याच्या माहितीवरून पोलिसांनी मोरेला कल्याण स्थानक परिसरातून अटक केली आहे. मोरे हा कल्याण परिसरात फूटपाथवर राहणारा आहे. राजगृह येथील सीसी टीव्हीत तोडफोड करत असल्याचे दिसणारा हाच आरोपी आहे. चौकशीत त्याने गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.


दादर येथील राजगृह परिसरात ७ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास एकाने तेथील फुलझाडांची नासधूस केली आणि इमारतीच्या काचा फोडल्या होत्या.  आठ ते दहा कंड्यांचे नुकसान करत तेथील सीसी टीव्हीही फोडण्याचाही प्रयत्न केला होता; मात्र सीसीटीव्हीचे नुकसान झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या सीसी टीव्हीमधून मिळालेल्या फुटेजच्या आधारे बुधवारी पोलिसांनी एका संशयित उमेश ताब्यात घेतले होते. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 447 व 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad