Top Post Ad

कोविड रुग्णालयाचा अभाव आणि अपु-या सुविधेमुळे उरणच्या मृत्यु संख्येत वाढ

उरण


 प्रशासनाकड़े वारंवार कोविड रुग्णालयाची मागणी करूनही उरणच्या नागरिकांसाठी हॉस्पिटलच्या बाबतीत शासनाकडून कोणताही पाठपुरावा होताना दिसून येत नाही. पनवेलचे आमदार तथा भाजप नेते प्रशांत ठाकुर, उरणचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे कामगार नेते महेंद्र घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटिल, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटिल,पनवेलचे माजी नगरसेवक संदीप पाटिल, शिवसेनेचे डैशिंग नेते बबनदादा पाटिल, जेष्ठ पत्रकार कांतिलाल कडु आदि राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते तसेच उरण सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेने उरणच्या नागरिकांसाठी कोविड रुग्णालयासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला मात्र शासनाने अजूनही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु केले नाही. या सर्वांनी उरण पनवेलसाठी सुसज्ज सर्व सुविधानी युक्त असे 1000 बेडचे रुग्णालय उभारावे अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी अजूनही पूर्ण होवु न शकल्याने शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे व हलगर्जीपणामुळे उरणकरांची सुरक्षा आता 'रामभरोसे' झाली आहे. आरोग्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने समस्त उरणकर आता 'वेंटिलेटर' वर आहेत.त्यामुळे प्रशासन आता फक्त उरण मधील नागरिकांच्या मृत्युची वाट बघत आहे असेच म्हणावे लागेल.


22 मार्च 2020 पासून करोना(कोविड-19)रोगाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र लॉक डाउन व  संचारबंदी लागू झाली. त्यानंतर दिवसें दिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. महाराष्ट्रातही लॉक डाउन जाहिर करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेच्या बाबतीत सर्वात पिछाड़ीवर असलेले, मूलभूत सुख सुविधा पासून वंचित असलेले तालुका म्हणून सुपरिचित असलेले उरण तालुक्यात आरोग्यसेवेचे आणखीनच तीनतेरा वाजले. सुरवातीपासुनच आरोग्य सेवेच्या बाबतीत मूलभूत सेवा सुविधा नसल्याने करोना तसेच इतर समस्यांची त्यात आणखीनच भर पडली. करोना रोगाचे भयंकर परिणाम लक्षात घेता महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात सुसज्ज व सर्व सुविधानी युक्त असे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. मात्र नेहमी प्रमाणे सर्वच बाबतीत उरण तालुका दुर्लक्षित राहिला.करोना सारखा साथीचा रोग उरण मध्ये पसरु नये.या रोगामुळे कोणाचा बळी जाउ नये. नागरिकांना निरोगी आरोग्य जगता यावे यासाठी उरण मधील विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांनी तसेच जनतेनेही मुख्यमंत्री, गृहमंत्री, रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी,तहसीलदार यांच्याकडे कोविड रुग्णालयसाठी पत्रव्यवहार करून त्वरित कोविड रुग्णालय उरण मध्ये उभारन्यात यावे अशी मागणी केली होती. ही मागणी करून 4 महीने उलटुन गेले तरीही उरण मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल अजूनही उभारले गेले नसल्याने करोना रुग्ण संख्येत तसेच करोना मृत्यु संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासन आता उरणच्या नागरिकांच्या मृत्युची वाट बघत आहे की काय ? प्रशासनाला जाग येईल तरि केंव्हा ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


22 मार्च 2020 पासून करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन जाहिर करण्यात आले. करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रोगावर त्वरित उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात किंवा 2-3 तालुके मिळून सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उभारन्यात आले. मात्र सुरवातीपासुनच उरण तालुक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. लॉक डाउन जाहिर झाल्या पासून उरणमध्ये वेंटिलेटरसह ऑक्सीजनची सेवा पुरविनारी सेवा सुविधांसह उत्तम कोविड रुग्णालय उभारन्यात यावे अशी मागणी विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाकडे केली मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री, रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार,JNPT   प्रशासन यांनी या मागणीकडे जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने उरणमध्ये करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढ़तच आहेत. शिवाय या रुग्णांवर उरण मध्ये योग्य उपचार होत नसल्याने त्यांना उरण तालुक्या बाहेर इतर ठिकाणी जावे लागत आहे.वेंटिलेटर व ऑक्सीजनच्या सुविधेसह सुसज्ज अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी उरण मधील रुग्ण, नागरिक नवी मुंबई, मुंबईकडे धाव घेत आहेत.शिवाय नवी मुंबई, मुंबई मधील हॉस्पिटल मध्ये उरण मधील नागरिकांना प्राधान्य नसल्याने त्यांच्यावर त्वरित व योग्य उपचार होत नाहीत तसेच हा खर्चही सर्व सामान्यांना परवडण्यासारखाही नसतो.उरण मध्ये अनेक मोठ मोठे प्रकल्प आहेत, उद्योगधंदे आहेत, व्यवसाय आहेत, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्या CSR फंडातुन उरणमध्ये कोविड हॉस्पिटल उभारले जाउ शकते मात्र येथील CSR फंडाचा इतर ठिकाणी दुरुपयोग केला जात आहे.त्यातल्या त्यात उरणमध्ये कोणत्याच सुविधा नसल्याने विविध रोगाने अनेकांचा मृत्यु होत आहे. त्यात करोनाचीही भर पडली आहे. दि 19/7/2020 रोजी उरण तहसील कार्याल तर्फे करोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्यात आजपर्यंत 627 करोना पॉजिटिव रुग्ण सापडल्याची नोंद आहे तर त्यापैकी 17 जणांचा मृत्यु तर 447 बरे होवून घरी परतले असल्याची नोंद आहे. तरि 18 रुग्णचे कोविड अहवाल प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. दररोज 20 ते 30 पॉजिटिव रुग्ण संख्येची वाढ यामध्ये होताना दिसत आहे.


- विट्ठल ममताबादे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com