Top Post Ad

'केरुमाते'साठीची लढाई स्वतः च्या बळावरच लढण्याची गरज

ही स्वार्थी लढाई तुम्ही स्वतः च्या बळावरच लढाप्रति,
मा. राजाराम पाटील साहेब,
केरुमाता मंदिर बौध्द लेणी बचाव आंदोलन कर्ता,
रायगड(,मुंबई)


मा‌.राजाराम पाटील साहेब,


    'केरुमाता मंदिर बौद्ध लेणी बचाव' या आंदोलनातील तुमचा ' प्रभात पर्व न्यूज' वरील  संपूर्ण व्हिडीओ व वक्तव्य  आताच लक्षपूर्वक पाहिले व ऐकले. एकंदरीतच या व्हिडीओ मध्ये आपण जी आग्रही भूमिका मांडत आहात, ती फक्त सिडकोकडून एक विशिष्ट आर्थिक लाभ तुमच्या आगरी कोळी समाजाला मिळावा,या दृष्टिकोनातूनच मांडत असल्याचेच  या व्हिडीओतून अगदी स्पष्टपणे सूचित होते,.आणि त्यातून जे पुढील प्रश्न उपस्थित होतात, आणि त्यांची उत्तरे देखील तुम्हीच दिली पाहिजेत. खरे तर 'केरुमाता' या काल्पनिक देवतेची त्या बौद्ध लेणीत सरळसरळ आगरी, कोळी, कराडी व भंडारी समाजाने कार्ले येथील बौद्ध लेणीतील एकवीरा देवीप्रमाणेच अतिक्रमण करुन स्थापना केली आहे. आणि याही गोष्टीला साक्षीदार इतिहासच आहे. आज अनेक पुराव्यांनिशी ते सिद्धही होत आहे.
    तुम्ही या व्हिडीओ मध्ये सांगत आहात की तुमचा समाज हा सम्राट अशोक काळापासून त्या परिसरात वास्तव्य आहे, तर ते खरे असेलही कदाचित. परंतु, तुमचा समाज मात्र अशोकाशी किती एकनिष्ठ होता, ही मात्र संशोधनाचीच बाब ठरेल .कारण, सम्राट अशोकाची बुद्ध व त्याच्या धम्माबद्दलची आस्था व एकनिष्ठता तर अवघे जगच जाणते. तुमच्या समाजाबद्दल मात्र तसे काहीही दिसून येत नाही. तुम्हीच येथे सांगतात की भगवान बुद्ध हा कोळी लोकांचा भाचा आहे, कारण बुद्धाची आई ही कोळी जातीची होती. अहो, ती कोळी जातीची असेलच कशी...? तीचे माहेर हल्लीचे नेपाळ मधील 'देवदह' हे नगर होते.आणि जगालाही ही गोष्ट माहिती आहे. समजा, जरी तुमचे हे म्हणणे खरे मानले तर मग हे तुमचे कोळी बांधव हे थेट नेपाळमधून कोकणात आले आहेत काय....?    


जर बुद्ध तुमच्या त्या 'एकवीरेचा पुत्र' होता, तर तुमचा हा आगरी कोळी समाज त्यांच्या भाच्याचा म्हणजेच बुद्धाचा बौद्ध धर्म सोडून हिंदू  झालाच कसा....? बुद्धाने सर्व प्रकारच्या हिंसेचा विरोध केला. तर मग तुमचा हा कोळी, आगरी समाज एकवीरा, केरुमाता व इतरही  अन्य देवीदेवतांना कोंबडे व बकऱ्यांचे बळी कसे काय देत असतो...? बुद्धाच्या कोणत्या तत्वात ही बळी देण्याची क्रूर व अमानवी प्रथा बसते, तेही तुम्हीच सांगावे. बौद्ध धर्मात कुठल्याही काल्पनिक देवतेस स्थान दिले नसतांना तुमच्या आगरी कोळी समाजाने एकवीरा, केरूमाता या तुमच्या तथाकथित मातृदेवतांची स्थापना बुद्धाच्या लेणींमध्ये केलीच कशी...?काय संबंध येतो त्यांचा बौद्ध संस्कृतीशी...? बौद्ध संस्कृती व स्वतः बुद्धदेखील या अशा  काल्पनिक देवीदेवतांचे अस्तित्वच नाकारतो, आणि तुम्ही बुद्धाच्या नावावर आपल्या काल्पनिक देवीदेवतांचा वृथा संबंध जोडून, त्यांचे नसलेले नाते बुद्धाशी जोडतात कसे, आणि कोणत्या आधारावर...? एकंदरीत तुमचा हा व्हिडीओ पाहता, तुमचा लढा हा सिडकोने तुमच्या पदरात काहीच दान टाकले नाही, यासाठीच असल्याचे स्पष्ट होते. आणि तुम्ही त्यात तसे अनेकदा स्पष्टपणे म्हटलेलेही आहे.      महोदय, तुमचा हा लढा बौद्ध लेणींसाठी नसून, त्या लेणींमध्ये अतिक्रमणाद्वारे स्थापण्यात आलेल्या तुमच्या त्या 'केरुमाते'साठीच आहे. कारण, त्यामुळे तिथे होणाऱ्या खूप मोठ्या आर्थिक उलाढालीला तुमच्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाज बांधवांना मुकावे लागेल. आणि, तो तुमचा कायमस्वरूपी होणारा खूप मोठा आर्थिक तोटा तुमच्या समाजाला कायमचाच बसेल. फक्त यासाठीच तुम्ही बौद्धांना बुद्ध व सम्राट अशोक यांच्या नावाने भावनिक आवाहन करुन, त्यांच्या खांद्यावरच आपली बंदूक ठेवून तुम्ही तुम्हाला हवा असलेला निशाणा साधत असल्याचे अगदी एखाद्या अडाण्यालाही स्पष्टपणे समजून येईल. अहो, खरेच जर तुमचे व तुमच्या आगरी कोळी समाजाचे बुद्धाशी व त्याच्या आईशी नाते असेल, तर तुम्ही त्यांचा म्हणजेच पर्यायाने तुमचाच असलेला गौरवशाली बौद्ध धर्म सोडून हिंदू झालातच कसे हो....? 
   आणि इतकी शतके तुम्हाला बुद्ध, अशोक , बाबासाहेब आठवतही नव्हते ते आता मात्र या 'केरुमाता' प्रकरणातच बरे आठवू लागलेत....?


     महोदय, तुम्ही जर खरेच बौद्ध अनुयायी असाल, आणि बुद्धाची आई ही तुमच्याच वंशातली  तुमची ती 'एकवीरा देवी' असेल, तर माझे तुम्हाला जाहीर व खुले आवाहन आहे, की तुम्ही तुमच्या सर्व समाजासह हिंदू धर्माचा त्याग करुन, तुम्हीच या व्हिडीओत  म्हटल्याप्रमाणे तुमचाच 'भाचा' असलेल्या बुद्धाचा 'बौद्ध धम्म' राजरोसपणे स्विकारण्याची हिंमत दाखवा की. आम्हीही मग तुम्हाला  बुद्ध, अशोक व बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी समजू....!तुमच्या या स्वार्थापोटी तुम्ही आवाहनाद्वारे बौद्धांना उगाचच भावनिक कशासाठी बनवू पाहताय....? तुमची ही स्वार्थी लढाई तुम्ही स्वतः च्या बळावरच लढा की. कशाला उगाच बौद्धांच्या नथीतून तीर मारुन,तुमचा 'निशाणा' साधत आहात....?"


                   अशोक नगरे   9067294505
      पाली भाषा व बौध्द इतिहास    आणि संस्कृती संशोधक..
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com