मिशन बिगीन अगेन अंतर्गत ठाण्यात बहुजन संग्रामकडून अन्नधान्य वाटप

दुसऱ्या टप्प्यात २६ जुलै रविवार रोजी ठाणे जिल्ह्यात १२०० लोकांना अन्नधान्य वाटपाचा संकल्प


   


ठाणे


मिशन बिगीन अगेन अंतर्गत (अनलॉक-२) च्या दुसऱ्या टप्प्यात २६ जुलैला रविवार रोजी ठाणे जिल्ह्यात १२०० /(बाराशे) ३१ जुलै उत्तर महाराष्ट्र १३०० (तेराशे) ९ ऑगस्ट रविवार मराठवाडा १०००( एक हजार) व १५ ऑगस्ट स्वतंत्र्यदिनाच्या मूहूर्तावर १५००( पंधराशे) मुंबई शहर व उपनगरांतील ५ हजार गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचे उद्दिष्ट ठरल्याप्रमाणे  पुर्ण करण्यात येणार आहे. सामाजीक बांधीलकी स्वीकारलेल्या, गरीबीची जाणीव,तसेच सहकार्याची भावना व दानत असलेल्या  हितचिंतक अधिकारी मित्रमंडळींच्या सहकार्यामुळेच  हे सामाजिक, विधायक कार्य करणे शक्य झाले व होत असल्याचे  भीमराव चिलगावकर यांनी सांगितले.


बहुजन संग्राम` या महाराष्ट्रव्यापक,  सामाजिक, विधायक, सेवाभावी संघटनेच्या वतीने कोरोनाच्या जागतीक महामारीच्या संकटकाळात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते ३० जून अखेर पर्यतच्या ४ महिन्याच्या कालावधीमध्ये  हातावर पोट असणाऱ्या सूमारे ५००० (पाच हजार) गोरगरिबांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू ,१ किलो गोडेतेल , पाव किलो चहापत्ती , १ किलो साखर ,१ किलो तूरडाळ ,१ किलो मिठ पाकीट ,१ किलो पोहे असे जवळपास १ हजार किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे संपूर्ण महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्यात वाटप केले आहे.


 आपण संपूर्ण महाराष्ट्रभर १० हजार गोरगरिबांना शिधा-किराणा देत आहात. कोरोनाचा, संसर्ग होण्याची तुम्हाला भीती, धोका वाटत नाही का ? म्हणून घरातच बसा सुरक्षित रहा,आनंदाने जगा, लोकांचे काय  देणे घेणे करू नका घरातच शांत बसा असे वारंवार विनंती करून मित्रमंडळी सांगत आहे. परंतु मी मित्रांना प्रेमाने सांगत आहे की, या  मदत कार्यात कोरोनाचा संसर्ग होवून  मला मृत्यू जरी आला तरी बेहत्तर परंतु १० हजार हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना अन्यधान्य देवून त्यांची होत असलेली उपासमार थांबवून त्यांना जीवदान देण्याचा  संकल्प व पक्का निर्धार केला असल्याचे स्पष्ट मत चिलगावकरांनी ''प्रजासत्ताक जनता''सोबत बोलतांना व्यक्त केेले.


 लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने  कोरोनाच्या या जागतीक महामारीपेक्षा उपासमारीने हाता वर पोट असलेली गोरगरीब लाखो जनता  मेली आहे, मरत आहे,व मरणार आहे. म्हणून कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पत्करून जीवाची पर्वा  न करता संपूर्ण राज्यभर वणवण भटकंती करत आहे. या महाराष्ट्रव्यापी मदत कार्य या सेवाभावी उपक्रमाची शासकीय वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली आहे.कोरोना या महामारीच्या जागतीक संकटकाळात केवळ सरकारवरच भिस्त न ठेवता स्वयंसेवी संघटना व सुस्थितीत असलेल्या व्यक्तींनी या मानवतावादी मदत कार्यासाठी हातभार लावून  आता कोरोनासोबतच आपण जगायला शिकावे असे मा. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे विधान परीस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करत आहे.या मदत कार्यात राज्यव्यापी बहुजन संग्राम संघटना व संपूर्ण महाराष्ट्रात  आघाडीवर ठरली असल्याचा विश्वासही चिलगावकर यांनी व्यक्त केला.  


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad