Top Post Ad

सुशिक्षीत मतदाराचा आमदार कुठे गेला

सुशिक्षीत मतदाराचा आमदार कुठे गेला


निवडणूका आल्या की मताच्या भिकेसाठी नवे नवे उमेदवार समोर येतात अन आश्वासनाचा बडगा उचलून घेतात.निवडणूका झाल्या जिंकून आले की, तू कोण आणि मी कोण.निवडणूकी अगोदर रोजगाराचा प्रश्न,सुशिक्षीतांना आर्थिक मदत,विविध खोटे आश्वासनाला सुशिक्षीत मतदारांना भुलवितात,त्यांची परिस्थिती सुधारण्याची स्वप्ने दाखवितात नंतर त्याच स्वप्नांची राखरांगोळी करतात.निवडणूकी वेळी मोबाइल वर,व्हॉट्सअपवर दिवसातून दोन मॅसेज करतात परंतू अलीकडे कोरोनाच्या सावटाखाली असणारा आमचा महाराष्ट्र शिक्षीत मतदार कसे दिवस घालवतो हे त्यालाच माहित आहे.प्रत्येक जण आपली पोळी भाजून झाली की,उमेदवाराची आठवण निवडून आल्यानंतरच्या पुढिल 5 वर्षानंतर काढतो आणि पुन्हा त्या सुशिक्षीताच्या उंबरठयावर जाऊन मताची भिक मागतो.


आजची परिस्थिती कोरोनाची असताना कोरोनाच्या प्रादुर्भावात अडकलेल्या आणि घरची परिस्थिती नाजूक त्यात नोकरी नाही ज्यांची होती त्यांना घरी बसावे लागले अशातच निवडूण दिलेल्या तो सुशिक्षीत उमेदवारांनी भरघोष मतांनी निवडून दिलेला आमदार कुठे आहे असा सवाल कुणाल शेलार यानी केला आहे.एक कोरोना विषाणूने सर्व सुशिक्षीत मतदारांना आता दाखवून दिले आहे की,कोणी तुमचा नाही,मग तो आमदार असो की साहेब.तुमच्या पोटाची खिणगी तुम्हालाच भरायची आहे हे आता सुशिक्षीतांना कळून आल्याने आता सुशिक्षीत मतदारांचा आमदार पुन्हा निवडूण येणार नाही याची दक्षता मात्र आता सर्व सुशिक्षीत मतदारांनी घ्यायला हवी.


मताचा भिकारी भिक मागण्यासाठी ओंजळ पुढे करित येतो तेव्हा आपल्यासाठी हा नेता काहीतरी करेल अडीअडचणीला मदत,साथ देइल असा विश्वास सुशिक्षीत बेरोजगार मतदाराला असते परंतु त्या विश्वासाला तो आमदार खरा उतरत नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे.निवडणूक वेळी मोबाइल नंबर सकट मतदाराचा शोध लावला जातो पण तेच जर कोरोनासारखे संकट मतदारांसमोर उभा राहतो तेव्हा हा सुशिक्षीत आमदार कुठं असतो असा सवाल आज सुशिक्षीत मतदारांना केला आहे.प्रत्येकासाठी वेगवेगळे आमदार असतात तसेच आपल्या सुशिक्षीत मतदारांचाही आमदार आहे परंतू तो आमदार निवडणूकीनतर आजपर्यंत कधीच आमच्या समोर आला नाही.


पुस्तक काढून खर्च करून आशवासनानी पाने भरली पण आजची कोरोना परिस्थितीत सशिक्षीत मतदारांचा पोट भरण्याचा विचार मात्र त्या आमदाराला आलाच नाही.कोरोना गेल्यावर हाच आमदार पुन्हा निवडणूक काळात मताची भिक मागायला तयार होणार असून त्यावेळी सुशिक्षीत मतदारांनी योग्य निर्णय घेऊन ना याला आणि ना त्याला नोटाला जिंकून देण्याचा निर्धार आज केला आहे.त्यामुळे त्या जिंकून आलेल्या सुशिक्षीत मतदारांच्या आमदारांनी कोरोना संकटात काळजी घ्या असा एक मॅसेजही न पाठवता निवडणूकी काळातील पोळी भाजवणारा तो आमदार साहेब जेव्हा येणाऱ्या नव्या निवडणूकीत पुन्हा चेहरा समोर घेऊन येइल तेव्हा सुशिक्षीत मतदारांचा उद्रेक त्यांच्या मतदानातून होइल यात शंका नसेलच.सुशिक्षीत मतदारांना कोरोनाच्या नावाने किट नको परंतू काळजीपुर्वक रहा असा मॅसेज येण्याची अपेक्षा होती त्या अपेक्षाचा मात्र विश्वास मोडला गेला त्यामुळे सुशिक्षीत मतदाराचा आमदार कुठे गेला असा सवाल आज केला जातोय.


कुणाल शेलार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com