शहापूर तालुक्यातील भागदळ संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिल्ह्यात प्रथम

भागदळ संयुक्त वन व्यवस्थापन समितीला मिळाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान

 

शहापूर

 

सन २०१८-१९ मध्ये ठाणे जिल्ह्यातील वनविभाग शहापूर व वनविभाग ठाणे यांचे कडून सहा संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी जिल्हा समितीकडे प्रस्ताव सादर केले होते त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीने केलेल्या मूल्यांकणानुसार शहापूर वनविभागातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती भागदळ यांना जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले असून द्वितीय पारितोषिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती काष्टी व तृतीय पारितोषिक संयुक्त वनव्यवस्थापन समिती शिवनेर यांना प्राप्त झाले आहे. पारितोषिक प्राप्त समितींना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस रक्कम रुपये अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार, ११ हजार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

 

संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत सन २०१८-२०१९ या वर्षाचा ठाणे जिल्ह्यात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान शहापूर तालुक्यातील भागदळ येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला प्राप्त झाला आहे.  इतर समित्यांनी देखील वनांचे संरक्षण करणे, व अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई आदींचा प्रतिबंध करून संत तुकाराम योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी वनविभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती  व्ही. टी. घुले उप वनसंरक्षक , वन विभाग शहापूर यांनी दिली आहे. 

 

           शहापूर वन विभागामध्ये एकूण सहा वनपरिक्षेत्र असून त्या अंतर्गत एकूण १४९ संयुक्त वन व्यवस्थापन समितींची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे, व अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई आदींचा प्रतिबंध करणे तसेच ग्रामीण जनतेमध्ये वनाच्या महत्वाविषयी जागृती करणे यासारखी कामे संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत करण्यात येतात.  कामात सतत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी जिल्हास्तर व राज्यस्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या समित्यांना पारितोषिक जाहीर करण्याकरिता संत तुकाराम वनग्राम योजना शासनाकडून राबविण्यात येते.   

 

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या