Trending

6/recent/ticker-posts

ठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी


ठाण्यातील कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी जनतेसमोर आणावीठाणे

 

ठाणे  शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर-सावरकरनगर आणि मुंब्रा प्रभाग समिती हॉट स्पॉट ठरले आहेत. त्याचबरोबर अन्य प्रभाग समितीतही रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, ठाणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडून कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. किंबहूना बाधीत रुग्णांची संख्या लपविण्याकडे सत्ताधारी आणि प्रशासनाचा कल असावा, असा संशय व्यक्त करीत राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या संख्येत तब्बल १ हजार १५५ रुग्णांची तफावत आहे, याबाबत चौकशी करून खरी आकडेवारी जनतेसमोर आणावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

 

ठाणे महापालिकेतर्फे दररोज सायंकाळी रुग्णांचे मृत्यू, बाधीत रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जाहीर केली जाते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फेही वेबसाईटवर बाधीत रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या प्रकाशित केली जाते. मात्र, या आकडेवारीत तफावत दिसते. ठाणे महापालिकेतर्फे १५ जून रोजी सायंकाळी कोरोनामुळे १६३ मृत्यू आणि ५०५६ बाधीत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, राज्य सरकारतर्फे त्याच दिवशी रात्री १० वाजता जाहीर केलेल्या यादीत १६७ मृत्यू आणि ६ हजार २११ रुग्ण बाधीत असल्याचे दिसते. त्यातून मृत्यूचा संख्येत ४ आणि बाधीतांच्या संख्येत तब्बल १ हजार १५५ रुग्णांचा फरक आढळत आहे. त्यामुळे ठाणे शहरात कोरोना रुग्णांची आकडेवारी लपविली जात आहे का, याची चौकशी करावी. तसेच कोरोनाबाधीतांची खरी संख्या जाहीर करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे.

 


 

Post a Comment

0 Comments