Top Post Ad

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही


 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही योध्ये  “बेलमास्तर”  शंकर श्रावण गायकवाड  

काळाराम मंदिर सोबत रामकुंडावर देखिल सत्याग्रह करण्याचा निर्णय जाहीर झाल्या नंतर त्यात अटकाव करण्याच्या हेतूने नगर पालिकेने रामकुंड साफ केल्या मुळे कुंड कोरडे पडले होते  १९ डिसेंबर १९३१ रोजी प्रचंड पाऊस झाला रामकुंड भरभरून वाहू लागले एका बाजूला सत्याग्रही दुसऱ्या बाजूला सनातनी हिंदू मध्ये पोलीस प्रत्येक जण संधीची वाट बघत होता त्यात एक सत्याग्रही शंकर श्रावण गायकवाड रंगाने गोरापान मजबूत बांधा शुद्ध भाषा बोलण्याची कला त्याने घरातूनच ब्राह्मण पुजाऱ्याचा वेष परिधान करून गंध टिळा पंचा पूजेच्या साहित्या सह रामकुंडावर पोहचला प्रथम त्याने पोलिसांशी संपर्क साधून महार सत्याग्रहींना प्रवेश देऊ नका असे वक्तव्य करीत इतर पुजाऱ्याशी स्मित हास्य करीत पूजेचे नाटक सुरु केले व वेळ येताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी घोषणा देत रामकुंडात उडी घेतली सनातनी हिंदू ब्राह्मणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली शंकर गायकवाड रक्त बंबाळ झाले त्यांचे चार दात पडले त्यास अटक झाली. न्याय मूर्तीने त्यास जामीनाचे विचारता माझा जामिन इंग्लडमध्ये असल्याचे सांगितले बाबासाहेब गोलमेज परिषदेसाठी इंगलंडमध्ये होते कोर्टाने गायकवाड याना सात दिवसांची सजा सुनावली जखमी गायकवाड याना बेलाच्या झाडाच्या पानामध्ये ठेवल्यामुळे त्यांना बेलमास्तर असे ओळखले जाऊ लागले.

बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तो ते तथाकथित चवदार पाणी पिण्यासाठी नाही; किंवा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा रामाच्या दर्शनासाठी नव्हता; तर इतर हिंदूंना जे अधिकार आहेत, तसे ‘समान’ अधिकार हिंदू धर्माचा भाग असलेल्या अस्पृश्यांना मिळवून देण्यासाठी होता.
साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी जे उपोषण केले होते ते विठ्ठलाचे दर्शनासाठी नव्हते तर इतर हिंदूंना जे अधिकार आहेत, तसे ‘समान’ अधिकार हिंदू धर्माचा भाग असलेल्या अस्पृश्यांना मिळवून देण्यासाठी होता.

सामाजिक समता हा आपल्या घटनेचा पाया आहे. घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्य सर्वांना समान आहेत. जातीनुरूप वेगवेगळे अधिकार आणि गुन्ह्याला वेगळ्या शिक्षा मनुस्मृतीमध्ये होत्या. संविधान समतेवर आधारित आहे. समरसतेला विरोध नाही पण ती समतेला पर्याय असू शकत नाही.  भोंगळ भावनिक सोईस्कर शब्द प्रसारित करून बुद्धिभेद हे संघी तंत्र आहे. त्यात अडकू नये.  आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रामुख्याने सामाजिक जीवनात जात, लिंग, भाषा, धर्म यांच्या आधारे प्रचंड असमानता अथवा विषमता असली तरीही सहजीवन जगले पाहिजे, हे विषमतेने पोळून निघालेल्यांना सांगणारा मंत्र म्हणजे ‘समरसता.’

समरसता म्हणजे समता नव्हे

 पुर्वी बायका सासरी निघाल्या की सांगायचे .... समरस होउन रहा.... म्हणजे मिळुन मिसळुन रहा. कुरबुर करु नकोस.. तोंड्गप्प ठेव ..पडती बाजू घे. इ इ.... आजही एखादा शुद्र मंदीरात दर्शनासाठी गेला तर सांगावे लागते गाभार्यात जाऊ नकोस, जायचा प्रयत्न केलास तर धक्काबुक्की सहन कर.. झालेला अपमान मुकाट्याने सहन कर.. पडती बाजू घे.. इ इ... 

समरसता ईज नॉट इक्वल टू समता.

समता म्हनजे समताच .. समरसता म्हणजे समता नसली तरी गप्प रहाणे अपेक्षित असते.  घटनेने स्वातंत्र्य समता बंधुता यांचा पुरस्कार केलेला असताना संघाने हे समरसता हे साडेतीनावं पिल्लु कशाला काढले ?  co-life with inequality म्हणजे समरसता.. जगभरात equality हा शब्द प्रचलित आहे.

समरसता हा दांभिक शब्द आहे.. 

समता मोजता येते. एका भाकरीचे दोन समान भाग मोजता येतात.
समरसता मोजता येत नाही, ती व्यक्तिसापेक्ष आणि ऐच्छिक असते असते.
समरसता असावी पण ती समतेला पर्याय म्हणून नको तर समतेला पूरक म्हणून असावी.

माझ्या भाकरीतील अर्धी भाकर तुला देतो, ही झाली समता. मी पुर्ण भाकर खातो तू पोटावर हात फिरवत ढेकर दे, ही समरसता. आम्ही म्हणजे इथला उच्चभ्रु वर्ग . आम्ही म्हणु तोच धर्म आणि तिच संस्क्रुती . तोच विचार आणि तेच संस्कार . या पलिकडे कोणी वेगळा विचार किंवा सिंद्धांत मांडायचा नाही . या अभिजन वर्गानी ठरवलेली चौकट कोणी उध्वस्त करायची नाही . थोडक्यात काय स्वतंत्र विचार मांडायचाच नाही . अभिजनांशी समरस होऊन राहायचे .
आम्ही लाथाडतो अशा समरसतेला ....

राज्यघटनेत स्वातंत्र्य व समता या मुलभूत हक्कांचा समावेश असल्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर काही बंधने आली किंवा व्यक्तीशी समतेचा व्यवहार झाला नाही तर न्यायालयात फिर्याद करून त्याविरुद्ध दाद मागता येते.स्वातंत्र्य व समतेचा अनुभव देणे  घटनेने बंधनकारक केले आहे.
राज्यघटनेला समरसतेशी देणे घेणे नाही.

संघपरिवाराला समरसता का हवी?..
 समतेचा आग्रह धरला की विषमतेविरुद्ध बंड करण्यास मान्यता दिल्यासारखे होते. असे बंड करण्याची क्षमता असलेला प्रचंड मोठा समाज भारतात आहे. तसे झाल्यास प्रस्थापित समाजव्यवस्थेला आव्हान निर्माण होऊ शकते. असे आव्हान निर्माण न होण्यासाठी प्रस्थापित विषमताधिष्ठित व्यवस्थेतच सर्व अ-प्रतिष्ठांना सामावून घेण्याची संघपरिवाराची व्यूहरचना..

विषमतेविरुद्ध आंदोलन अथवा संघर्ष न करता तिचे भक्ष्य ठरलेल्यांनी, बळी पडलेल्यांनी... संघ म्हणतोय म्हणून त्या परीस्थितीशी त्या विषमतेला  वंदनीय मानून त्याच्याशी एकरूप पावणे म्हणजे समरसता.
म्हणजे थोडक्यात ठेविले अनंते तैसेची रहावे..
शेतकऱ्यांनी पडलेल्या शेतमाल बाजाराशी एकरूप अथवा सहमत व्हावे.. समरस व्हावे.. भाववाढीचे संघर्ष न करता.. दलालांनी, बाजाराने दिलेल्या भावाबद्दल तक्रार न करता नेहमीप्रमाणे गप्प पडावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com