Top Post Ad

होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला पालकमंत्र्यांची भेट





होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला पालकमंत्र्यांची भेट



ठाणे


शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घोडबंदर रोड येथील होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. क्वारंटाइन केंद्रात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जेवणाची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर ध्वनीक्षेपकाद्वारे त्यांनी तेथे विलगीकरण करण्यात आलेल्यांशी संवाद साधून त्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. विलगीकरण केलेल्या नागरिकांची जबाबदारी पालिकेची असून तुम्हाला कुठलाही त्रास जाणवू नये, यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. काहीही अडचण जाणवत असल्यास नि:संकोच सांगा, असे आवाहन शिंदे यांनी केले. स्वत: पालकमंत्र्यांनी संवाद साधल्यामुळे येथील रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले.


करोनाविरोधातील मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत. करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर्सही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र, या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी ठाणे महापालिकेने घ्यायची आहे. याबाबतच्या तक्रारी खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद शिंदे यांनी दिली.  कोव्हिड रुग्णालये व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण व संशयितांना उत्तम आहार मिळणे, तेथील बेड, गाद्या, उश्या, चादरी यांची व्यवस्था, औषधे व स्वच्छता साहित्याची उपलब्धता, रुग्णवाहिकांची उपलब्धता यावर  शिंदे स्वत: सातत्याने लक्ष ठेवून आहेत. याप्रसंगी नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, महापालिका अधिकारी अशोक बुरपुल्ले आदी उपस्थित होते.


येथील रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी जेवण आणि औषधांबाबतच्या तक्रारी तातडीने दूर करण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना दिले. क्वारंटाइन सेंटरमध्ये अतिजोखमीचे संशयित रुग्ण ठेवण्यात येत असून त्यांची कुठलीही आबाळ होता कामा नये, या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले सुनील केदार या शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला न्यूमोनिया झाल्यामुळे अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कुटुंबियांची काळजी वाटत असल्याचे शिंदे यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी तात्काळ संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरूनच चर्चा करून श्रीमती केदार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचारात काहीही कमी पडू न देण्याच्या सूचना केल्या.


ठाण्यातील तीन हात नाका येथील गुरुद्वारातून रोजंदारीवर काम करणारे मजूर, गोरगरीब जनतेसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत हे कार्य सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आणि संस्थेशी हितगूज करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुद्वाराला भेट देली.  शीख बांधवांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचनचीही पाहणी केली. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून शीख बांधव करत असलेल्या मदतीबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.






 

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com