Top Post Ad

देवस्थानांकडं पडून असलेलं सोनं केंद्र सरकारनं ताब्यात घ्यावं- चव्हाण

'देशातील सर्व देवस्थानांच्या ट्रस्टकडं पडून असलेलं सोनं केंद्र सरकारनं कर्जरूपानं ताबडतोब ताब्यात घ्यावं - चव्हाण


सातारा


तब्बल दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा ठप्प झाला आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर राज्य पातळीवर उद्योगधंद्यांना काही प्रमाणात सवलती दिल्या गेल्या असल्या तरी त्यानं फारसा फरक पडलेला नाही. हातावर पोट असलेल्या व छोट्या-मोठ्या उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. 'करोना'च्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय सुचवला आहे. 'देशातील सर्व देवस्थानांच्या ट्रस्टकडं पडून असलेलं सोनं केंद्र सरकारनं कर्जरूपानं ताबडतोब ताब्यात घ्यावं,' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.


अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सरकारनं जीडीपीच्या किमान १० टक्के प्रोत्साहन पॅकेज द्यावं, अशी मागणी मी सातत्यानं करत होतो. तसं पाऊल सरकारनं टाकल्याबद्दल मी समाधानी आहे. आता या पॅकेजचा योग्य विनियोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्याचबरोबर इतर उपाययोजना सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारनं देवस्थानांच्या ट्रस्टकडून कर्जरूपानं सोनं ताब्यात घ्यावं,' अशी सूचना केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Concil) अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोनं १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं,' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com