रमाई आवास योजनेची घरकुल रखडली
गोरगरिबांचा संसार उघड्यावर येणार वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
शहापूर
रामाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी मिळणारे सरकारी अनुदानाचा उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना वेळेवर न मिळाल्याने अनेक गोर गरीब जनतेची घरकुल रखडून पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडणार असल्याची भीती व्यक्त होत असून या लाभार्थ्यांना त्वरित घरकुल अनुदानाची उर्वरीत रक्कम वेळेत देण्यात यावी असे निवेदन इमेलद्वारे वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे .
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून गोर गरीब ,वंचित दुर्बल घटकातील लोकांना रमाई आवास योजनेतून घर बांधण्यासाठी सरकारी आर्थीक अनुदान दिले जाते. या योजनेत दिली जाणारी आर्थीक मदत ही अनेक टप्प्यात दिली जाते. त्यानुसार रमाई आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून सुरुवातीला काही रक्कम अदा करण्यात आलेली आहे .त्यानुसार लाभार्थ्यांनीं आपली जुनी घर मोडून नवीन बांधकाम सुरू केले आहे .पण उर्वरित रक्कम येणे पूर्णपणे बंद झाल्याने घरांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.
या योजनेचा दुसरा हप्ता लाभधारकांना न मिळाल्याने ते चिंतेत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे तसेच सध्याचा कडक उन्हाळा आणि त्यात कोरोनाचे महा संकट शिरावर असल्याने गरीब कुटुंबाची घरं पुर्ण झाली नाहीत तर ऐन पावसाळ्यात त्यांचा संसार उघड्यावर पडेल अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आह तरी आपण राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने त्वरीत याकडे लक्ष घालून संबंधित लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेची उर्वरित रक्कम अदा करण्याचे आदेश द्यावेत असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करुन त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे या संदर्भात राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना देखील इमेलद्वारे कळविले आहे .
0 टिप्पण्या