सोशल मिडीयावर टार्गेट करणार्‍यांना वेळीच अटकाव करण्याची राष्ट्रवादीची मागणी

सोशल मिडीयावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट करणार्‍यांना वेळीच अटकाव करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना पत्रठाणे


सोशल मिडीयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूर (जिल्हा) पालकमंत्री मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत अश्लील भाषेत टीका करण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी-मुलीवर बलात्कार करण्यासह त्यांची हत्या करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.  त्यामुळेच कार्यकर्त्यांकडून उद्रेक होत आहे. म्हणूनच या समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे. 
आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अनंत करमुसे या इसमाने अत्यंत गलिच्छ शब्दांत गेले 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्या विरोधात लिखाण केले आहे.  महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री तथा सोलापूर (जिल्हा) पालकमंत्री मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेज टाकण्यात आले आहेत. त्यांच्या पत्नी व मुलीवर बलात्कार करु इथपासून ते तुमचा दाभोळकर करु, असे खुलेआम ट्विटर आणि फेसबुकवर टाकण्यात आले आहे.
एकीकडे वैचारीक युद्ध चालू असताना निष्कारण अश्लील भाषेचा वापर करुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो. दुसरीकडे खून, बलात्कारासारख्या धमक्या दिल्या जातात. आणि याच्याविरुद्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. तरी आपण याला वेळीच अटकाव करावा आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. 
आनंद परांजपे यांनी या निवेदनासोबत, डॉ. आव्हाड यांना देण्यात आलेल्या धमक्या, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसंदर्भात केलेल्या अश्लील टीप्पण्याचा यांचे स्क्रीनशॉटही जोडले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad