Top Post Ad

शेअर बाजारात घसरणीचा  बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रांना बसला फटका

शेअर बाजारात घसरणीचा  बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रांना बसला फटका



मुंबई


आज बाजार उघडताच सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेतली. दुपारपर्यंत सेन्सेक्सने ३१,५६८ अंकांवरून १,३०० अंकांची कामाई केली. पण बाजार बंद होताना तो ३०.३९८ अंकांवर बंद झाला. निफ्टीतही हाच कल दिसून आला आणि तो ०.७६ टक्क्यांनी खाली घसरून थांबला. बँक, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रांना अधिक फटका बसल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. 


निफ्टी बँकेत कोटक बँकेला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला असून तो ६.१७ टक्के एवढा होता. एचडीएफसी बँकेचे शेअर्सदेखील ३.५८% नी घसरले. त्यानंतर बंधन बँकेचे ३.२१% तर बँक ऑफ बडोदाचे शेअर्स १.८१%नी घसरले. इतर इंडसइंड बँक, आरबीएल बँक, फेडरल बँकेने अनुक्रमे १.८ ते ३.३% दरम्यान वृद्धी केली. हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटर आणि मारुती सुझूकी यांचे शेअर्स एनएसई‌वर अनुक्रमे ४.९५%, ४.६६% आणि ३.५७%नी घसरले. आरआयएल, टाटा पॉवर, ओएनजीसी आणि पॉवर ग्रिडमधील घसरणीसह ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सनाही मोठा फटका बसला.


एफएमसीजीचा चढा मार्ग:


३० एप्रिलपासून लॉकडाऊन शिथील होण्याच्या आशेने बुधवारी एफएमसीजी क्षेत्राने मात्र शेअर बाजाराला चांगलाच आधार दिल्याचे श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डाबर, नेस्टले, आयटीसी आणि मॅरीकोसारख्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. बंद होताना ते ४ टक्क्यांच्या वृद्धीवर होते. युनायटेड ब्रेवरीज, युनायटेड स्पिरीट्स, पी अँड जी व इमामी या कंपन्यांचे शेअर्स शेवटच्या काही तासात तणावाखाली दिसल्या. एस अँड पी बीएसई एफएमसीजीदेखील ४.३३% च्या वृद्धीवर गेला. या ४३ कंपन्या फायद्यात तर २५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घसरले. या गटात डीएफएम फुड्सचे शेअर्स संपूर्ण दिवसाच्या व्यापारात १९.९९ टक्क्यांनी वाढले.


फार्मा कंपन्यांतही उदासीनता:


निफ्टी फार्माने आज बाजारातून दुरावा राखल्याचे चित्र असून ते क्षेत्र ०.०६% ची घसरण घेऊन बंद झाले. या यादीतील फक्त डिव्हिस लॅबोरेटरी, ऑरबिंदो फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी या तीन कंपन्यांचे शेअर्स फायद्यात होते. कॅडिला हेल्थचे शेअर्स ४.१४% तर टोरेंट फार्माचे शेअर्सदेखील ३.३२% नी घसरले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com