Top Post Ad

सफाई कामगारांना मास्क, शूज,  हँडग्लोव्हज व सॅनिटायझर्स तातडीने उपलब्ध करून द्या - महेश कांबळे

सफाई कामगारांना मास्क, शूज,  हँडग्लोव्हज व सॅनिटायझर्स तातडीने उपलब्ध करून द्या - महेश कांबळे

ठाणे -


   सध्या राज्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सफाई कामगारांवर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने सर्वाधिक कामाचा ताण पडत आहे. परंतु  स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना आवश्यक असलेली  साधनसामुग्री उपलब्ध करून दिलेली नाही. त्यांना मास्क, शूज,  हँडग्लोव्हज व सॅनिटायझर्स तातडीने उपलब्ध करून दिले पाहिजेत.  त्याच बरोबर त्यांना 3 महिन्याचे संपुर्ण रेशन मोफत दिले पाहिजे . वैद्यकिय सेवक व पोलिसां प्रमाणे यांनाही योग्य रकमेची  विमा सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. म्हणून या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सामुग्रीचा तातडीने पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी  महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
आज आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत. परंतु नेहमीच शहराची किंवा परिसराची साफसफाई करणारा हा कर्मचारी वर्ग दुर्लक्षित राहातो. त्याला आपल्या रोजगाराची चिंता असल्याने तो या सर्व उणिवा असूनही काम करीत राहतो. आजची परिस्थिती ही विचित्र असल्याने त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या सफाई कामगारांकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहिले गेले पाहिजे. मुंबई आणि ठाण्यामध्ये लॉकडाऊन जरी असले तरी शेकडो टन कचरा गोळा होत आहेत. त्यांची ही परिस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. इतरवेळीसुध्दा स्वच्छता मोहीमेचा बराच गाजावाजा होत असतो. पण ही मोहीम ज्यांच्यामुळे यशस्वी होते त्या सफाई कामगारांच्या वेतनापासून ते सुरक्षिततेपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होते. पुरेशा सुविधा नसल्यामुळे अनेक सफाई कामगारांना वेगवेगेळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कोरोनासारख्या साथीच्या काळात त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com