जागतिक पुस्तकदिन !!
35 हजारांहून अधिक पुस्तकांसाठी 'राजग्रुह' उभारणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल." हा क्रांतिकारी संदेश देणा-या "आजन्म विद्यार्थी" बाबासाहेबांचे जग आज मनोभावे स्मरण करता आहे...
ज्ञानसूर्याच्या या अफाट ग्रंथसंपदावर एक नजर फिरवू या...
कास्ट्स इन इंडिया (१९१७),
स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८),
द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३),
दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४),
वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६),
अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६),
मिस्टर गांधी ॲंड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स(१९४५),
रानडे, गांधी ॲंड जिन्ना (१९४३),
थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५),
हॉट कॉंग्रेस ॲंड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स (१९४५),
महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५),
हू वर दि शुद्राज? (१९४६),
स्टेट्स ॲंड माइनॉरिटीज (१९४७),
हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी ॲंड बॅंकिंग (१९४७),
द अनटचेबल्स: हू वेअर दे ॲंड व्हाय दे बिकम अनटचेबल्स(१९४८),
थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट (१९५५),
बुद्ध ॲंड कार्ल मार्क्स (१९४६),
कम्युनल डेडलाक ॲंड वे टू सॉल्व इट (१९४५),
बुद्ध ॲंड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०),
फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रैसी (१९५१),
लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स ॲंड बॅलेन्सेज (१९५३),
बुद्धिज्म ॲंड कम्यूनिज्म (१९५६),
द बुद्धा ॲंड हिज धम्मा (१९५७),
हिंदू वुमन: राइजिंग ॲंड फॉल
ही तर झाली बाबासाहेबांची ग्रथसंपदा ! राइटिंग्ज अँड स्पिचेस वेगळे !!
जगाच्या पाठीवर जे socio-political leaders होऊन गेले ते या ज्ञानभांडाराच्या पासंगालाही पुरत नाहीत !
विशेष म्हणजे केवळ लेखन एवढेच बाबासाहेबांना काम नव्हते; तर एकाचवेळी अध्ययन, सामाजिक लढे, सभा-परिषदा आणि भारताचे संविधानही लिहायचे होते !!
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देत असताना सर्वप्रथम या महामानवाला वंदन करावं लागतं ! कारण हा चिरंतन दस्तावेजच आपल्यासाठी दिपस्तंभ होय !!
0 टिप्पण्या