Top Post Ad

लॉकडाऊनच्या शांत वातावरणात फ्लेमिंगोंचा स्वच्छंद विहार

लॉकडाऊनच्या शांत वातावरणात फ्लेमिंगोंचा स्वच्छंद विहार


मुंबई


लॉकडाऊनमुळे असलेली शांतता फ्लेमिंगो पथ्यावर पडली आहे.  परदेशी पाहणे असलेले फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी आवर्जून नवी मुंबई आणि उरण, ठाणे, वसई आदी परिरात विसावतात. यंदाही ते आले आहेत. नेहमीपेक्षा जरा जास्तच संख्येने त्यांचा स्वच्छंद विहार खाडीकिनारी सुरू आहे. दरवर्षी एप्रिल-मेमध्ये नवी मुंबई परिसरात फ्लेमिंगो दाखल होतात. नवी मुंबई, उरण, ठाणे, पाणजू बेट, वसई आदी परिसरात दाखल झाले आहेत. सारा परिसर फ्लेमिंगोंनी फुलून गेला आहे. लॉकडाऊनमुळे खाडीचे पाणीही स्वच्छ आहे. फ्लेमिंगोचे आवडते खाद्य असलेली एल्गी (algae) वनस्पतीही चांगली उगवली आहे. पाणी निर्मळ आहे. हवा स्वच्छ आहे. त्याचा आनंद फ्लेमिंगो घेत आहेत, असे जंगल आधिकारी सांगतात.


वसई - उत्तन खाडीत पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या मच्छीमारांनी प्रथमच आपण पाणजू खाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुलाबी पक्षी पाहिले असल्याचे सांगितले. दरम्यान, फ्लेमिंगोंचे आगमन झालेल्या ठिकाणी वनाधिकाऱ्यांनी आता सुरक्षा वाढवली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक परिसर मोकळे आहेत. फ्लेमिंगो सहवासात राहणे पसंत करतात. ते नेहमी मोठ्या संख्येनेच प्रवास करतात. त्यांना मुक्कामात कसलाही त्रास नको असतो. अशा काही गोष्टींकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले.


लॉकडाऊनचा कालावधी एक प्रकारे फ्लेमिंगोंचा अभ्यास करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फ्लेमिंगो वाढले नवी मुंबई आणि पाणजू खाडीत फ्लेमिंगोंचे प्रमाण वाढले आहे, पण त्याचे कारण उरणमधील खाडीतील पाणी कमी झाले असल्याचेही काहींचे मत आहे. काहींच्या मते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फ्लेमिंगोंचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे. 25 टक्क्यांनी ते वाढल्याचे सांगितले जात आहे. यंदा दीड लाख फ्लेमिंगो आले असल्याचा अंदाज आहे. नवी मुंबईत दरवर्षी सहा हजार फ्लेमिंगो येतात. ही संख्या यंदा साडेआठ हजार असल्याचेही सांगितले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com