Top Post Ad

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून सामान्य ग्राहकांची लूट 

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून सामान्य ग्राहकांची लूट 



 शहापूर


कोरोना विषाणूच्या भीतीने सर्वत्र लॉकडाऊन असल्याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी आपला मनमानी कारभार सुरु केला असून शहापूर शहरासह ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांसह भाजीपाला विक्रेत्यांनी चढया भावाने वस्तूची विक्री करुन सर्वसामान्य ग्राहकांची अक्षरशः लुट सुरु केल्याचा संतापजनक असा प्रकार उजेडात येत आहे .


शहापूर ,वासिंद ,किन्हवली ,डोळखांब , खर्डी ,कसारा या भागातील किराणा मालाचे व्यापारी यांनी प्रत्येक किलो वस्तुमागे ४ते ५ रुपये भाव वाढविले आहेत तसेच भाजीपाला विक्रेते फिरते व दुकानदार यांनी आपल्या मर्जीप्रमाणे प्रत्येक भाजीचे किलोमागे १० ते १५ रुपयांची भरघोस अशी स्वंयमघोषित दरवाढ करून लूटमार सुरु केल्याच्या नागरिकांंच्या तक्रारी आहेत हे भाजीपाला विक्रेते भाजीपाल्याची वाहतूक होत नसल्याचे कारण सध्या पुढे  करत आहेत.


एकिकडे कोरोनामुळे लॉक डाऊन परिस्थिती असताना जीवनावश्यक वस्तूंचा असा हा काळाबाजार भाजीविक्रेत्यांसह अन्य व्यापाऱ्यांनी मांडल्याने सर्वसामान्य शेतकरी,मजूर कुटुंबांनी या देशपातळीवरील आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना तरी कसा करायचा? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com