महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवडा रद्द- शिवा संघटनेची घोषणा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द केल्याची घोषणा.


शिवा संघटनेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे 40 बैठका संपन्न.


शिवा संघटनेच्या वतीने 26 एप्रिलला सकाळी 10 वाजता आप-आपल्या घरी एकाच वेळी


कुटुंबाकडून महात्मा बसवेश्वरांना जयंती निमित्त अभिवादन करण्याचा निर्णय.


 
उरण  (विठ्ठल ममताबादे)


 उरण येथील शिवा संघटना मागील 20 वर्षांपासून प्रतिवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा करते, परंतु यावर्षी कोरोनामुळे देशात लाॅकडाऊन चालु आहे. त्यामुळे दिनांक २६ एप्रिल  रोजी "महात्मा बसवेश्वर यांची जयंती" साजरी करण्यावर निर्बंध आले आहेत. तसेच या वर्षीचा शिवा संघटनेचा महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा रद्द करण्यात आला आहे. याचा निर्णय व्हीडियो कॉन्फरेन्स द्वारे झालेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहिर केला आहे. परंतु तरीही जयंतीच्या दिवशी  आप-आपल्या घरी हजारो कुटुंबाकडुन जयंती साजरी करणार असल्याची घोषणा शिवा संघटनेकडून करण्यात आल्याची माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी व्हिडियो कॉन्फरेन्सद्वारे दिली आहे.


 शिवा संघटनेच्या वतीने  आवाहन केले आहे की,रविवार दि.26 एप्रिल 2020 रोजी सकाळी ठिक 10 वाजता, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक व प्रसारक महात्मा बसवेश्वर यांची 889 वी जयंती हजारो कुटुंबांकडुन एकाच वेळी आप-आपल्या घरीच कुटुबांसह साजरी करा.  महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला घालावा आणि सर्व कुटुंबीयांनी प्रतिमेसमोर हात जोडून उभे राहुन अभिवादन करावे.  राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,नगरविकास मंत्री आदि शासनाच्या महत्वाच्या मंत्री,प्रशासनास पत्रव्यवहार करून शासनाच्या विविध कार्यालयात सोशल डीस्टनिंगचे नियम पाळून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात यावी तसे संबंधितांना आदेश द्यावेत याबाबत लेखी स्मरण पत्र शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रूपेश होनराव,प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य-मनीष पंधाडे,राज्य संघटक-नारायण कंकणवाडी यांच्यासह राज्यातील विविध विभागातील जिल्हयाचे सर्व जिल्हाध्यक्ष,पदाधिकारी-कार्यकर्ते सोशल मीडियाद्वारे तळागाळात संपर्क साधुन लॉक डाऊन व संचार बंदीचे नियम पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करत बसवेश्वर जयंती घरीच साजरा करण्याविषयी जनजागृती करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad