Top Post Ad

मजुरांच्या कमतरतेमुळे उद्योग सुरु होण्याची शक्यता धुसर

मजुरांची कमतरता, मागणी आणि कोविड चाचणी झालेली नसल्याने उद्योग सुरु होण्याची शक्यता धुसरनवी दिल्ली


देशातील एकूण अप्रवासी कामगारांपैकी २४% उत्तर प्रदेशातील आहेत. या राज्यातील कामगार दिल्ली व मुंबईसारख्या शहरांतून परतले तर ३ मेनंतर उद्योगांसमोर ही मोठी समस्या असेल. जेएनयूचे माजी प्रोफेसर व अर्थतज्ञ प्रो. अरुण कुमार यांच्या मते, मजुरांची कमतरता, मागणी आणि कोविड चाचणी झालेली नसल्याने सुमारे ६०% उद्योग मंजुरीनंतरही तत्काळ उघडू शकणार नाहीत. रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टीमचे (आरआयएस) अमिताभ कुंडू म्हणाले, देशात अप्रवासी लोकांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. यातील बहुतांश आपापल्या गावी परततील. त्यामुळे उद्योगांची चिंता अधिक वाढली आहे.


उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व छत्तीसगड परराज्यांतून मजुरांना परत आणणार लॉकडाऊनमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या राज्यांत अडकलेल्या मजुरांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अशा मजुरांची यादी तयार करण्याचे व त्याप्रमाणे बसचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व छत्तीसगडचे सीएम भूपेश बघेल यांनीही इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना परत आणण्याची तयारी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कोटाहून ८ हजार विद्यार्थी आणण्यासाठी यूपीनेच सर्वप्रथम बस पाठवल्या होत्या. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, प. बंगाल व आसामने आपले विद्यार्थी नेणे सुरू केले होते. दरम्यान, गुरुवारी बिहार सरकारने हायकोर्टात म्हटले की, १७ लाख बिहारींना परत आणणे शक्य नाही. त्यावर कोर्टाने केंद्राला प्रतिवादी करत नोटीस जारी केली.


लॉकडाऊनमध्ये उघडल्या जाणाऱ्या दुकानांसाठी केंद्र सरकारने शुक्रवारी रात्री नवा आदेश काढला. गृह मंत्रालयाच्या या आदेशानुसार, शहरी भागांत शॉप अॅक्टनुसार नोंद असलेली सर्व दुकाने उघडू शकतील. यात छोट्या कॉलनी, गल्लीतील दुकानांसह निवासी वस्त्यांतील दुकानांचाही समावेश आहे. मात्र, हा आदेश हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये लागू असणार नाही. शहरांतील मार्केट कॉम्प्लेक्स, मल्टी ब्रँड आणि सिंगल ब्रँड मॉल मात्र उघडता येणार नाहीत. दुसरीकडे ग्रामीण भागांत मार्केट कॉम्प्लेक्स, निवासी वस्त्यांतील दुकानांसह सर्व नोंदणीकृत दुकाने उघडता येतील. उघडलेल्या दुकानांत निम्म्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावले जाईल. त्यांना मास्कसह सोशल डिस्टन्सिंगसंबंधी सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ही सूट वगळता लॉकडाऊनमधील इतर नियम किंवा बंधने पूर्वीसारखीच कायम राहतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com