स्टॉक मार्केट २०२०च्या पहिल्या तिमाहीत ४% ची घसरण
मुंबई,
आजच्या प्रतिकात्मक प्रदर्शनानुसार, स्टॉक मार्केटने ४% एवढा मजबूत वेग घेत २०२० मधील पहिल्या तिमाहीचे चित्र स्पष्ट केले. एस अँड पी सेन्सेक्सने नॉर्थ ३.६२ % च्या तेजीसह १ हजार अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी ३.८२ % टक्क्यांनी वाधरत ३२६ अंकांनी पुढे आला. तथापि २०२० मधील पहिल्या तिमाहीतील हे आकडे दोन्ही मार्केटसाठी ऐतिहासिक घसरण दर्शवणारे ठरले. १९९२पासून निफ्टीने सर्वात वाईट तिमाही अनुभवली असून २०२० मधील हा टप्पा सेन्सेक्सच्या इतिहासातीलही सर्वात नुकसानकारक ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
नकारात्मक वातावरण असल्याने मार्च महिन्यात भारतीय इक्विटी बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. या एकूण एफपीआय आउटफ्लोची किंमत ५८,३४८ कोटी रुपये एवढी होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनडीएसएल)कडे उपलब्ध आकडेवारीनुसार, ही रक्कम आतापर्यंतची सर्वाधिक आहे.
भारतात अत्यंत कठोर लॉकडाउन व उपाययोजना होत असूनही कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समूहातही खूप भीती निर्माण झाली असल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले. पुढील काही दिवस अधिक गंभीर असून भविष्यातील चित्र आणखी स्पष्ट करतील. मात्र एक चांगली बाजू अशी की, कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या मंदीची झळ भारत आणि चीनला अपवादात्मक रुपात बसणार नाही, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. लॉकडाउनची बंधने हटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत नूतनीकरणाचा उत्साह वाढणे अपेक्षित आहे.
0 टिप्पण्या