Top Post Ad

राहूल मखरे याचं निखील वागळेंना उत्तर

मा. निखिल वागळे साहेब,
जयभीम, जयमुलनिवासी.



परवा आपला 26 मिनिटांचा व्हिडीओ पाहिला व गांधीजींची आठवण झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा गांधीजींच्या बद्दल म्हणाले होते की "गांधीजी  जाती प्रथेच समर्थन करण्यासाठी जे करत आहेत तो त्यांचा बौद्धिक वेश्या व्यवसाय आहे."  तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याची आठवण झाली. माझ्या सारख्या हजारो लोकांचे तुमच्या बद्दल या व्हिडिओ मुळे असेच मत बनले आहे.  तुमच्या पत्रकारिते बद्दल थोडाफार आदर होता तो एका क्षणात संपला आहे.
3 जानेवारी 2018 ला डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी  "द वायर" ला लेख लिहिला होता व त्यात त्यांनी कोरेगाव-भीमा च्या इतिहासाचा संदर्भ देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर खोटारडे आहेत असे लिहिले होते. ते कम्युनिस्ट(साम्यवादी) विचारसरणीचे आहेत असे मी ऐकून होतो. तस त्यांना सो कॉल्ड विचारवंत सोडले तर समाजात कोणी ओळखत नव्हत व जेंव्हा त्यांना समाज ओळखू लागला तेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खोटारडे ठरवणारा व्यक्ती म्हणूनच ओळखू लागला. ही वस्तुस्थिती असताना व पत्रकार म्हणून तुम्हाला ती माहीत नसण्याचे कोणतेही कारण नसताना त्यांना तुम्ही वारंवार आंबेडकरवादी म्हणून संबोधित करत आहात.
काय साम्यवाद व आंबेडकरवाद एकच आहेत ?
साम्यवाद व आंबेडकरवाद एकच असते तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  "बुद्ध की कार्ल मार्क्स ?"  मध्ये साम्यवादाच्या विरोधात भूमिका घेतलेली तुम्ही वाचली नाही काय ?  जर वाचली असेल तर साम्यवादी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना आंबेडकरवादी संबोधने हा तुमचा बौद्धिक वेश्या व्यवसाय नाही का ?
आता  डॉ. आनंद तेलतुंबडे स्वतःविषयी काय म्हणत आहेत ते तुम्हाला सांगतो. 
"...पिछले पांच दशकोसे इस कॉर्पोरेट दुनियामे एक शिक्षक के रूप मे , एक नागरिक अधिकार कार्यकर्ता के रूप मे और एक बुद्धिजीवी के रूप मे इस देश की सेवा करनेका मेरा बेदाग रेकॉर्ड है ।  वाक्याच्या अगोदर ते असेही म्हणतात की, ....नौकरी के काम मे पूर्ण समय व्यस्त रहने के कारण नागरिक अधिकार कार्यकर्ता की भूमिका निभा नही पा रहा हूँ.....  ते स्वतः सांगतात की ते काय आहेत. ते जर स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत नसतील तर तुम्ही त्यांच्यावर आंबेडकरवादी असण्याचा आरोप जबरदस्तीने का थोपवत आहात ?  पुढे तुम्ही हे ही सांगितले की डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक म्हणजे बाबासाहेबांच्या घराण्याचा तो अपमान आहे. मी घराणेशाही मानत नाही पण चर्चेकरता थोडा वेळ मी घराणेशाही मान्य करत आहे.  तुम्ही तर घराणेशाही वैगरे मानत नाही असे अनेक वेळा ठासून सांगितले आहे. (उदयनराजे भोसले यांच्या बद्दलचे ऑडीओ, व्हिडीओ आठवून पहा.)
आणि आता.... बाबासाहेबांच्या घराण्याचा अपमान झाला असे लोकांना भावनिक करत आहात ? आम्हाला किंवा आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना अस दुटप्पी बोलायची हिम्मत होत नाही राव... तुम्ही धडधडीत बोलता, जणांची कोणतीही न ठेवता... 
 डॉ. आनंद तेलतुंबडेचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा काय संबंध ?
नात जावई म्हणून ?
आपल्या परंपरेत असे काही आहे का ?
फर्स्ट ब्लडचे लोक हयात असताना कायद्यात तरी नात जावयाला कुटुंबातील व्यक्ती म्हणून मान्यता देतात का ?  फर्स्ट ब्लड रिलेशन सोडून द्या, सेकंड ब्लड रिलेशनमध्ये सुद्धा ते बसत नाहीत पण तरीही तुम्ही ओढून ताणून त्यांना बाबासाहेबांच्या कुटुंबाचे सदस्य का करत आहात ? त्यांचा सख्खा भाऊ मिलिंद तेलतुंबडे त्यांच्या फर्स्ट ब्लड रिलेशनशिप मध्ये येतो.  त्यांच्या बद्दल जर थोड सांगितल असत व डॉ. आनंद तेलतुंबडे हे मिलिंद तेलतुंबडे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत अस म्हटल असत तर ते जास्त वास्तविक ठरल असत पण मिलिंद तेलतुंबडे यांच्या पार्श्वभूमीबद्दल तुम्हाला माहीत असल्यान तुम्ही ते सोयीस्कररीत्या बोलण्याच टाळल. हे तुम्ही बौद्ध लोकांच समर्थन मिळवण्यासाठीच करत आहात ना ?
बर...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नात जावई म्हणून कोणी निर्दोष असतो काय ?  
तसच मिलिंद तेलतुंबडे या टॉप मोस्ट नक्षलवादी व्यक्तीचा भाऊ म्हणून त्यांना दोषी मानता येईल काय ?
दोन्ही प्रश्नांच उत्तर नाही असच आहे.
कोरेगाव-भीमा दंगलीशी त्यांचा काही संबंध नाही, सरकारी पोलीसांनी त्यांच्यावर याबाबत खोटे गुन्हे दाखल केले आहेत असे जर तुम्ही सांगितले तर ते खरे आहे असेच म्हणावे लागेल व या मुद्द्यावर त्यांनी , तुम्ही किंवा मा. प्रकाश आंबेडकरांनी लोकांना समर्थन मागितले तर समर्थन नक्की मिळेल पण आमच्या भोळ्या समाजाला वारंवार भावनिक करून त्यांचा वापर तुम्ही करणार असाल तर तो तुमचा बौद्धिक वेश्या व्यवसाय ठरेल हे मी तुम्हाला ठासून सांगतो. कोरेगाव-भिमा दंगलीशी त्यांचा पोलीस संबंध जोडत असतील तर सरकार, पोलीस व संविधान विरोधी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन झाले पाहिजे या मताचे आम्हीही आहोत. कोरेगाव-भीमा चौकशी आयोगा समोर आता पर्यंत जेवढे साक्षीदार तपासले गेले त्यापैकी एकानेही , 'नक्षलवाद्यानी दंगल घडवली' असे सांगितले नाही. या उलट पोलिसांनी 31 जानेवारीला कोरेगाव भीमा येथील लोकांना समज दिली असती, प्रतिबंधक कारवाई केली असती तर 1 जानेवारीला दंगल झाली नसती असे भिडे-एकबोटे संबंधित सरपंचाने उलट तपासात कबूल केले आहे.
एवढेच नाही तर भिडेला बत्तीस मन सिंहासनासाठी  ₹ 10000 /- घोषित करणाऱ्या व्यक्तीने उलट तपासात असे सांगितले की, "1 जानेवारी 2018 रोजी सकाळी वडू-बुद्रुक वरून भगवे झेंडे घेऊन जो दीडशे दोनशे लोकांचा जमाव आला तो तोच जमाव आहे ज्यांनी दंगल घडवली. 
(हा भिडेचा समर्थक व्यक्ती त्या जमावाबरोबर उपस्थित होता हे ही त्याने कबूल केले आहे.)
मग डॉ. आनंद तेलतुंबडे व इतर आरोपींचा व दंगलीचा संबंध आला कोठे ?
(या बाबतीतचे रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार आहे.)
त्यामुळे आम्ही किमान या मुद्द्यावर त्यांना समर्थन देऊ शकतो.
दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मा. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते की चौकशी होऊ द्या, मी भिडे-एकबोटेला नागडे करतो.  याचा अर्थ भिडे-एकबोटे यांनी दंगल घडवली याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत पण तरी सुद्धा ते पुरावे त्यांनी चौकशी आयोगासमोर दिले नाहीत. 
कोरेगाव-भीमा व परिसरात 1 जानेवारी 2018 ला दंगल झाली... ही दंगल "फडणवीस-भिडे-एकबोटे" यांनी घडवली असे आमचे पुराव्यानिशी म्हणणे आहे  तर ही दंगल "भिडे-एकबोटे" यांनी घडवली असे मा.प्रकाश आंबेडकरांचे म्हणणे आहे. या बाबतीत तत्कालीन फडणवीस सरकारचे म्हणणे होते की ही दंगल अर्बन नक्षलवाद्यांनी घडवली. अर्बन नक्षलवाद्यांनी दंगल घडवली ही सरकारची थेअरी अद्याप पर्यंत चौकशी आयोगासमोर फ्लॉप ठरली आहे. मग राहीली पहिली थेअरी म्हणजेच ही दंगल फडणवीस, भिडे-एकबोटेने घडवली.
ठीक आहे , मा. प्रकाश आंबेडकर यांना फडणवीसांचे नाव घ्यायचे नसेल तर नाही घेऊ द्यात आम्ही त्यासाठी खंबीर आहोत पण त्यांनी चौकशी आयोगाकडे भिडे - एकबोटे यांच्या विरोधातील पुरावे दिले असते तरी डॉ. आनंद तेलतुंबडे व इतर आरोपींना त्याचा फायदा झाला असता पण ते तसे करताना दिसत नाहीत.  फडणवीसांना वाचवण्याच्या प्रयत्नात मेहुणा जेल मध्ये गेला तरी अजून ते पुरावे देत नाहीत. डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या पत्रातील अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा इथे उपस्थित करणे मला आवश्यक वाटते. ज्यावेळी याच प्रकरणी इतर आरोपींना अटक करण्यात आली होती त्यावेळीच्या संदर्भात बोलताना ते म्हणतात की, "...पुलीस को मेरे ठिकाने का पता था और वह तब भी गिरफ्तार कर सकती थी, लेकीन ऐसा उन्होने क्यूँ नही किया ये उन्हे ही पता होगा ।
या वाक्याचा अर्थ समजला का तुम्हाला ?
 की समजावून सांगितला पाहिजे ?
पोलीस त्यांना अटक करू शकत होती पण केली नाही असे ते स्वतः म्हणत आहेत.  त्यावेळी त्यांना पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाई पासून फक्त एकच माणूस अडवू शकत होता तो म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. 
देवेंद्र फडणवीसांनी कोणा बरोबर समझोता करून डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक टाळली होती हे न समजण्याइतपत लोक खुळे नाहीत.  या सर्व घडामोडी व पुराव्यांच्या आधारे देवेंद्र फडणवीसांनी मा. प्रकाश आंबेडकर फसवले आहे हे तुम्हाला कळत नाही काय ?  या प्रकरणात आम्ही देवेंद्र फडणवीसांना दोष देणार नाही, त्यांच्या DNA चा तो दोष आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला मा. प्रकाश आंबेडकरांचा फायदा होत होता म्हणून ब्राह्मणांचा मीडिया त्यांना वारंवार टिव्ही चॅनलवर दाखवत होता ,जशी निवडणूक संपली तशी त्यांची गरज संपली व ब्राह्मणांच्या मीडियाने त्यांना वारंवार दाखवणे बंद केले. आता तरी त्यांना ब्राह्मण व ब्राह्मणवाद एकच आहेत हे समजले असेल अशी आशा आहे. सुप्रीम कोर्टात जर जातीयवाद,ब्राह्मणवाद असेल तर त्यांनी आता पुरोगामी ब्राह्मण व प्रतिगामी ब्राह्मण असा भेद करणे बंद केले पाहिजे. (ही आमची भूमिका नाही, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे हे वारंवार आम्हाला सांगावे लागत आहे.)
भारतातील सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे कारण विदेशी ब्राह्मण आहेत हे स्वीकारले पाहिजे.  पण ते तसे करणार नाहीत अशी खात्री आहे.   ज्या बहुजन समाजातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन समजले ते लोक 14 एप्रिल दिवशी घरात मयत झाले तरी त्या दिवसापूरते दुःखात असतील व ते ही मयत झालेल्या घरा पुरतेच पण लगेच पुढच्या वर्षी वर्षश्राद्ध न घालता 14 एप्रिलला आनंदोत्सवच साजरा करतील. 
बाबासाहेबांच्या पेक्षा घरातील कोणतीही व्यक्ती त्यांना प्रिय नाही. असे असताना 14 एप्रिल दिवशी राजगृहवर काळा झेंडा लावला जातो हा खूपच किळसवाणा प्रकार आहे असे तुम्हाला व त्यांना वाटत नाही का ?  एखादा तरी ब्राह्मण चांगला असतो असे तुम्ही एखाद्या न्यायाधीशांचा उल्लेख करून म्हणू शकता , यावरही मी फुले-शाहू-आंबेडकर-पेरियार- प्रबोधनकार ठाकरे यांचे संदर्भ देऊन लिहू शकतो पण आता यात वेळ घालवत नाही कारण तुम्ही लोकांनी झोपेच सोंग घेतलेल आहे, तुम्हाला आम्ही जागे करूच शकत नाही. 
वाचकांसाठी याबाबतीत दोनच मुद्दे सांगतो. 
एखादा चांगला ब्राह्मण सर्व वाईट ब्राह्मणांना वाचवत असतो,
त्या एका ब्राह्मणामुळे ब्राह्मणवादाच्या विरोधातील सर्वच विद्रोह नष्ट केला जातो म्हणून तो ब्राह्मण जास्त धोकादायक ठरतो. 
दुसरा यापेक्षाही जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्राह्मण चांगला असला तरी तो आमचा प्रतिनिधी होऊ शकत नाही.
आमचे बहुजन समाजाला एवढेच सांगणे आहे की ब्राह्मणांनी या देशातच राहिले पाहिजे व त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व केले पाहिजे. आम्ही त्यांच्यावर विनाकारण अन्याय करणार नाही व आमच्या महापुरुषांची विचारधारा तशी आम्हाला अनुमतीही देत नाही. 
डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी जे पत्र लिहिले आहे त्यात त्यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे ,
"...तुमची वेळ येण्याअगोदर तुम्ही बोलाल अशी मला अपेक्षा आहे".
भारतातील ब्राह्मणांनी अशी वेळ आणली आहे ही खरी गोष्ट आहे पण त्याचबरोबर गेली 42 वर्ष आम्ही या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात बोलत आहोत हे कोणीही नाकारू शकत नाही.
तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आता आम्हाला पुन्हा भावनिक बनवू नका.
तुम्ही असेल किंवा तुमच्यासारखे अन्य कोणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन बौद्धिक वेश्या व्यवसाय करू नका. अशा गोष्टी मुळेआंदोलनात अडथळे निर्माण होत आहेत. डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्यावर जी वेळ आली आहे व ज्या प्रकरणात व ज्या  कायद्यामुळे आली आहे ही खरच निषेधार्ह गोष्ट आहे.  फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी एकत्र येऊन ब्राह्मणी व्यवस्था संपविल्या शिवाय असे प्रकार थांबणार नाहीत....
       
              -  ऍड. राहुल मखरे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com