Top Post Ad

तरीही मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ सुरूच

तरीही मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ सुरूच



मुंबई


करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी  योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीत वाढता आर्थिक ओघ सुरुच आहे.  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी आत्तापर्यंत १९७ कोटी रुपये जमा केले आहेत ही मदत करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. या निधीत ८३ दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. देशातील अनेक वाहिन्यांवर केवळ पीएम केअर फंडात जमा झालेल्यांनाच कर सवलतीचा फायदा मिळणार अशा जाहीराती असतानाही महाराष्ट्रातील नागरिकांचा आणि उद्योगपतींचा मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा स्त्रोत सूरूच आहे.



गेल्या दोन दिवसांत ग्राफाइट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लुराइन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. या शिवाय लहान मुलांसह अनेक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावला आहे. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-१९' हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० असून, अन्य तपशील - स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३, शाखा कोड ००३००, आयएफएससी कोड - एसबीआयएन ००००३०० असा आहे. या देणग्यांना प्राप्तिकर अधिनियम १९६१च्या ८० (जी)नुसार करकपातीतून १०० टक्के सवलत देण्यात येते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com