नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने सिडको बस स्टॅन्ड येथे निरंतर जेवणाची सोय
ठाणे
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशन परिसरात वावरणाऱ्या गोरगरीब गरजू लोकांना नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक 09-04-2020 रोजी सिडको बस स्टँड येथे जेवणाची सोय करण्यात आली ही व्यवस्था लॉक डाउन झाल्यापासून निरंतर चालू ठेवण्यात आलेली आहे तसेच ही जेवणाची व्यवस्था १५ एप्रिल पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. या प्रसंगी नवी मुंबई परिवहन चे उन्हाळे साहेब , किरण लवेकर, कुणाल गायकवाड तसेच मंडळाचे सदस्य अजय पवार, गणेश जयस्वाल, मुकेश पवार, किशोर बनकर, गणेश लोखंडे, दीपक सकपाळ, डोनल्ड, दगडू, विराज, सन्नी, साहिल, समीर इ .उपस्थित होते. आपणास कुणास स्वइच्छेने मदत करावयाची असल्यास त्यांनी मंडळांचे सदस्य अजय पवार, गणेश जैस्वाल यांच्याशी संपर्क साधावा
0 टिप्पण्या