अस्पृश्य मूळचे कोण..
शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण हा फरक अजूनही सामान्य जणांना याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे अस्पृश्य मूळचे कोण हा ग्रंथ उपेक्षित राहिला. शूद्र मूळचे कोण होते हा एकच ग्रंथ आहे असे दिसून येते इतकेच नव्हे तर हा ग्रंथ अस्पृश्याची उत्पत्ती सांगणारा आहे असाच समज झाला शूद्र आणि अस्पृश्य हे दोन्ही समुदाय वेगवेगळे आहेत. हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे ब्राह्मणी ग्रंथानुसार आजचे ब्राह्मण आणि वैश्य वगळता बाकीचा ८५℅ टक्के समाज शुद्र आहे. ब्राह्यणानुसार परशुरामाने २१ वेळा पृथ्वी वरील क्षत्रिय नाहीसे केले म्हणजे क्षत्रिय शिल्लक राहिला नाही.. याच मुद्द्यावरून संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षी शाहु महाराज या सारख्या बहुजन समाजातील पुरुषांना शूद्र ठरवण्याची कुटील कारस्थाने झालेली आहेत.. यावरून ब्राह्मणी ग्रंथ शूद्र कोणाला समजतात हे समजून घ्यावे ब्राह्मणी ग्रंथांनी गावकुसाच्या आत राहणार्यांना शुद्र ठरवले..त्यामध्ये मराठा, माळी, साळी, तेली, धनगर, सोनार, सुतार या बारा बलुतेदारहे सर्व शुद्र आहेत..शुद्रामध्ये अस्पृश्य गणला जात नाही.याच्यातुन वेगळा समाज महार, मांग, चांभार इतर समाज अस्पृश्य वर्ग म्हणजे स्पर्श करण्यास योग्य नाही असा वर्ग अस्पृश्य. शुद्र हा पूर्वीच्या सुर्यवंशी जातीचा क्षत्रिय होते.एक काळी त्यांना उपनयन ,वेदाचा अभ्यास, यज्ञ करण्याचा अधिकार होता..कारण ते त्या काळचे राजे होते. विश्वमित्र राजा,सुदाम, बळीराजा,शंबुक एकलव्य,रावण,हिरण्यकश्यप,भक्त प्रल्हाद ही मंडळी सुर्यवंशी.यांना युध्दात परिजात करुन त्यंाचे राज्य बळकावुन त्यांच्या पुढच्या पिढीला गुलाम बनून शूद्र केले त्यामध्ये महार, मातंग, चांभार अशा अस्पृश्यांचा काहीही संबंध नाही. गावकुसाबाहेर राहणाऱ्यांचा चातुरवरणात सामावेश नाही, त्यांचा पाचवा वर्ण काढण्याची गरज भासली नाही.. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,शूद्र जन्मा आले कोणी बेबीतुन कोठुनही प्रसुती झाली.. पण शूद्र बाकी पायातून जलमला म्हणजे बहुजनांची हेटाळणी करण्यासाठी त्याला पायाखालची जागा दाखवली..पाय ही बहुजनांची जन्मभूमी ब्राह्मणांनी अस्पृश्याना जन्म दिला नाही कसा देईल तो त्याला शिवत नव्हता..असंपृश्य म्हणजे आजची महार जमात ही जात महाराष्ट्रात अनादीकाळापासून वास्तव करत व ही जमात शासनकर्ती होती..महाराष्ट्रातील महार जमात लढवयी आणि नागवंशी होते.महादेव हा देव नागवंशांचा देव हा पुरावा त्यांच्या गळ्यात असणाऱ्या नागावरून मिळतो.ती व्यक्ती संपूर्ण भारतात आदरणीय पूजनीय आहे महादेव म्हणजे महारदेव महारांच्या नावापुढे नाग हा शब्द लावला जात होता.हे नागवंशीय राजे होते शिशुनाग ह्या नावावरून पुरावा मिळतो.थुथुनाग, महानंद, हर्षवर्धन, कुशाण, सातवाहन हे नांगवंशीय राजे होते याचीसाक्ष इतिहास देतो.इ.स. दुसऱ्या तिसऱ्या शतकात चंद्रगुप्त मौर्य हा राजा नागवंशीय होता. चंद्रगुप्त मौर्यचा नातु बृहद्र्थ हि वंशावळ नांगवशीय महाप्रापी राजाची सहाव्या शतकात बृहद्रथाची पुष्पमित्र शुंग नावाच्या त्यांच्याच दरबारी असणाऱ्या एका ब्राह्मण सरदाराने कपट करून त्याची हत्या केली.व तेथील तो मालक झाला..ही नागवंशी जमात प्राचीन काळी बौद्ध धर्मीय होती त्यांची संस्कृती उच्च कोटीची होती. सहाव्या शतकात शशांक, मिहिरकूल, अल्लाउद्दीन खिलजी याच्या मदतीने पुष्पमित्र शुंगाने देशातील बौद्ध धर्मीयांचा नायनाट करुन बौद्ध भिक्यु्कांच्या कत्तली केल्या तर काही बौद्ध भिक्षू मरणाच्या भीतीने देश सोडून परदेशात गेले.देशातील बौध्द धर्मियांचा अमानवी छळ करणात आला. त्यातूनच जगण्याची धडपड करीत राहिलेली पिढी अस्पृश्य झाली तीच अस्पृश्य महार जात.
भारतावर अनेक परकीय स्वाऱ्या होत राहिल्या शक, कुशाण, हुण, इराण, तुराण,अफगाण, डच, पोर्तु्गाल, इग्रंज आशा परकीयांच्या स्वाऱ्या आल्या येथील रहिवासी टोळ्यांशी युद्ध करून त्यांना पराजय करून त्यांचे राज्य लुटली. काही परत गेले तर काही येथे स्थायिक झाले.या सर्वांच्या अगोदर इराण मधून आलेले हेच युरेशियन वैदिक ब्राह्मण आजचे ब्राह्मण महाराष्ट्रातील दक्षिण ब्राह्मणात देशस्य, कोकणस्थ, कर्हाडे, देवरुखे या पोटजाती मानल्या आहेत.परंतु , सारस्वत ब्राह्मणात मांसाहार असल्यामुळे त्यांची पोटजात समजली नाही. याच प्रमाणे पंजाब, बंगाल, कानोजी, गुजराती, तेलंगी, काश्मिरी पंडित, पंढरपूरचा बडवाभट, आंध्रा चा पुजारी हे सर्व उच्चनीय ब्राह्मणच पण एकमेकात रोटी बेटी व्यवहार नाही..युरेशियन ब्राह्मण भारतात आले येथील मूळनिवासी लोकांनी आधार दिला त्यांना मोठ्या उदार मनाने ओसरी दिली. तीच मोठी चूक या मूळनिवासी लोकांची झाली. "भटाला दिली ओसरी तोच हळूहळू पाय पसरी" हि म्हण. सुरुवातीला धर्म तयार करून देव तयार केला. बहुजनांचे मेंदू नासून टाकले त्यांना गुलाम केले. धर्माच्या रक्षणाकरिता दशवतर त्यांनीच घेतला येथील मूलनिवासी राजांना राक्षस बनवून त्यांच्या हत्या केल्या. व राजसत्ता बळकावली त्यातूनच पुढची पिढी वंशज शूद्र, अस्पृश्य बनविले. व त्यातूनच देशाचे शासनकर्ते करते बनले..वर्गभेद जगात सर्वत्रच आहे पण भारत देशात जास्त मोठं जंगल आहे इतकं दाट जंगल जगात कोठेच नाही.पण ६००० जातीत जंगल भारतात आहे.त्या जंगलाच्या तळाशी अस्पृशंय जंगल हे आज दाटीवाटीने जगत आहे. बुद्ध धम्म हा देशात कायम राहिला असता तर अस्पृश्यता या देशातून नाहीशी झाली असती. परंतु बुध्द धम्माच्या उदयानंतर सुमारे ४०० च्या सुमारास अस्पृश्यता लागु झाली.. महार हा नागवंशी राजा सावकार योद्धा इमानदार होता. यांचा इतिहास तपासून पहावा मंगळवेढ्यातील बेदरच्या बादशहाकडून सोडविणारा विठ्ठल हा महार सावकार होता..खर्ड्याच्या लढाईत परशुरामभाऊ पेशव्याला वाचविणारा सिदनाक हा महार होता..छत्रपती शिवाजी महाराज रक्षण करणारा जिवा महार होता.. इंग्रजांची सामना करना रायगड चा रक्षक रायनाक महार होता..पेशवाई संपवणारे कोरेगाव सांभाळणारे महार होते. हे विसरून चालणार नाही तो शूद्र नव्हता ब्राह्मण नव्हता त्याला अस्पृश्य बनवलं होतं..त्याच अस्पृश्य समाजातील एका महामानवाने देशाची राज्यघटना बनवली तो देशाचा घटनेचा निर्माता झाला..
संदर्भ - अस्पृश्य मुळचे कोण.?
शिव, फुले, शाहु, आंबेडकर वर्तमानातील सत्यशोधक
नवनाथ होले
0 टिप्पण्या