तो व्हायरल व्हीडीओ फेक
मुंबई
एक व्हिडिओ सर्वत्र फिरवला गेला आणि पहा हा मरकजवरून आलेला तब्लिगी कसा पोलिसांवर थुकतोय असे म्हणत व्हिडीओ सुद्धा व्हायरल करण्यात आला. दिल्ली मरकजमध्ये लॉकडाउन काळात तब्लिग जमातचे लोक अडकून पडल्यानंतर संबंध मीडियाने त्यांच्याबाबत नाही ते आरोप करून त्यांना थेट आरोपीच करून टाकले, काहींनी तर चक्क त्यांना चालते फिरते टाईम बॉम्ब म्हणूनही संबोधले परंतु पुराव्यावर विश्वास ठेवून काम करणारी मीडिया अचानक बेभान होत सैर-भैर होत नको ते शब्द वापरून या प्रकरणात मीठ मिरची लावून बातम्या करू लागली,
पण आता या व्हिडिओची पोलखोल झाली असून हा व्हिडीओ तब्लिग जमातच्या इसमाचा नसून तो एका आरोपीला न्यायालयात घेऊन जातानाच जुना व्हिडीओ असल्याचे आणि त्याचा तब्लिग जमात किंवा दिल्ली मरकज याच्याशी दुरुनही संबंध नसल्याचे आता उघड झाले आहे. याबाबत मग मीडिया अंध कशी बनली हा शोधाचाच विषय म्हणावा लागेल. पाहूया या व्हिडीओ मध्ये काय होते, तर या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पोलिस गाडीत पोलिसांसमवेत बसलेली आहे आणि समोर बसलेल्या पोलिसाच्या अंगावर ती थुकली आहे.
या व्हिडिओतून दावा करण्यात येत होता की पोलिसाच्या अंगावर धुंकणारी व्यक्ती तब्लिगच्या निझामुद्दीन मरकजमधून आली होती.हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. मात्र या व्हिडिओची खात्री केल्यानंतर हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील ठाण्यातील असून 2 महिन्यांपूर्वीचा म्हणजे 29 फेब्रुवारीचा असल्याचे मुंबई मिररच्या बातमीतून समोर येत आहे. या बातमीनुसार एक २६ वर्षीय आरोपीला मुंबई न्यायालयात आणले गेले होते त्यावेळी त्या आरोपीला घरून आलेले जेवण जेवू दिले गेले नाही. त्याला न्यायालयातून ठाणे सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येत असताना आरोपी हा पोलीस व्हॅनमध्ये पोलिसांच्या अंगावर धुंकला होता. या बातमीचा व्हिडीओ मुंबई मिररच्या रिपोर्टमध्ये आहे. जो आता चुकीच्या पद्धतीने काहींनी लोड करून तो शेअर करत दिल्ली मरकज मधून आलेले तब्लिग जमातचे लोक पोलिसांवर थुकले असा दाखवून व्हायरल केला जात आहे. अशी माहिती सहकारनामा ऑनलाईनने ४ एप्रिल रोजी प्रकाशित केली आहे.
0 टिप्पण्या