Trending

6/recent/ticker-posts

जागतिक बाजाराने दिले सकारात्मकतेचे संकेत: एंजल ब्रोकिंग

जागतिक बाजाराने दिले सकारात्मकतेचे संकेत: एंजल ब्रोकिंग


मुंबई


    इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोव्हिड-१९ चे प्रमाण तीव्र असल्याचे सुरुवातीचे संकेत मिळाले आहेत. पण जागतिक गुंतवणूकदारांसाठी यातून सकारात्मक संदेश मिळत असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंग यांनी व्यक्त केले. अमेरिकी बाजाराने २.५% ते ३.५% दराने बढत घेतली तर आशियाई बाजारातही सुरुवातीला बढत मिळाली. सेन्सेक्स १,२६५.६६ अंकांनी वाढून ४.२३% च्या वृद्धीसह बंद झाला. तर निफ्टीनेही ४.१५%ची बढत घेत ३६३.१५ अंकांपर्यंत उसळी घेतली. भारतातील कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्रीय नेतृत्व सक्रियतेने सहकार्य करत आहेत. या घटनांचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर सकारात्मक परिणाम होत असून नुकतेच बाजारात सुरु झालेल्या बदलांकडे गुंतवणूकदार एक ‘स्वीट एंट्री पॉंइंट’ म्हणून पाहत आहेत.


वाहन क्षेत्र: वाहन क्षेत्राने ऑटो इंडेक्समध्ये मजबूत सुधारण दर्शविल्याचे श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. दोन्ही बाजाराचे निर्देशांक आज १०% वाढून बंद झाले. मदरसन सुमी, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझूकी आणि टाटा मोटर्स हे सर्व दोन अंकांनी वाढले. बीएसईवर हे १०.३६% ते १७.५३% दरम्यान बंद झाले. सर्व शेअर्सनी आज कमीत कमी ४ टक्क्यांची बढत अनुभवली.


बँक आणि फार्मा क्षेत्रातही वाढ:  निफ्टी बँक इंडेक्समध्ये आरबीएल बँक, बंधन बँक आणि इंडसइंड बँक हे सर्वच आज उत्तम स्थितीत होते. आयसीआयसीआय बँकेने ७.४५ %, अॅक्सिस बँकेने ७.३६ %, आयडीएफसी फर्स्ट बँकेने ७.३०% आणि कोटक बँकेने ७.१८ % ची बढत घेतली. बँक ऑफ बडोदानेही ५.२७% आणि एचडीएफसी बँकेने ४.०७%ची वृद्धी मिळवली. दुसरीकडे निफ्टी फार्माच्या १० स्टॉक बॅरोमीटरमध्ये फक्त डॉ. रेड्डीज लॅबमध्ये घसरण दिसून आली. सिप्ला आणि लुपिन आज अनुक्रमे १३.०४% तसेच ११.९८ टक्क्यांनी वाढले . कॅडिला हेल्थ गुरुवारी ०.३६% बदलासह काही पावले पुढे दिसून आले.


 Post a Comment

0 Comments