Top Post Ad

शहापूर पोलीसांच्या धडक कारवाईत ४८ हजार किमतीची गावठी दारू जप्त

कोरोना महामारीत गावठी दारू भट्टी तेजीत ; शहापूर पोलीसांची धडक कारवाई ; केले ४८ हजार किमतीचे आठ ड्रम उध्वस्त 

 

 

शहापूर

 

महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर गावठी हटभट्टीच्या दारूची भट्टी चालवून विक्री करण्याचा उद्देशाने गावठी दारू गाळणाऱ्या  दोन अज्ञात इसमांवर मंगळवारी शहापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या खबरी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहापूर तालुक्यातील सरलांबे गावच्या हद्दीतील मौजे खुटाळी गावाच्या जवळ भातसा कॅनलच्या बाजूला ओहळालगत कोणीतरी अज्ञात इसम गैरकायदा गावठी हटभट्टीच्या दारूची भट्टी चालवून विक्री करण्याचा उद्देशाने गावठी दारू गाळत आहे. अशी अधिकृत बातमी निळाल्यानुसार मंगळवारी दुपारी २.३० वाजता शहापूर हद्दीत गस्त घालत असतांना झाडाझुडपातुन हवेत धूर निघत असल्याचे दिसले म्हणून पोलीसांनी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. त्यावेळी ओहोळाच्या किनारी एका ठिकाणी  मातीच्या पेटत्या चुलीवर लोखंडी पत्र्याचे बॉयलर दिसला. भट्टीच्या आसपास पाहणी केली असता कोणीही इसम दिसून आला नाही.

अधिक तपासणीत झाडाझुडुपांमध्ये वशचे बॅरल दिसून आले. १२ हजार रुपये किंमतीचे दोन ड्रम त्यात प्रत्येकी २०० लिटर असे एकूण ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणारा गुळ व नवसागर मिश्रित वश, सहा हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी पत्र्याचा पिंप २०० लिटर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणारा गुळ व नवसागर मिश्रित वश व एक दगडी चूल मिळून आली. 

तसेच दुसऱ्या ठिकाणी ६.३० वाजता छापा टाकला त्यात १८ हजार रुपये किंमतीचे तीन ड्रम त्यात प्रत्येकी २०० लिटर असे एकूण ६०० लिटर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणारा गुळ व नवसागर मिश्रित वश, बारा हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी पत्र्याचे पिंप प्रत्येकी २०० लिटर असे एकूण ४०० लिटर   गावठी हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणारा गुळ व नवसागर मिश्रित वश व एक दगडी चूल असे मिळून आली. मालामधून नमुन्यासाठी एका काचेच्या स्वच्छ बाटलीत १८० मिली गुळ व नवसागर मिश्रित वश काढून घेऊन ती जप्त करून  उर्वरित सर्व मुद्देमाल पोलीस स्टेशनला घेऊन जाणे जड व अवघड असल्याने  जागीच नाश करण्यात आला. असा सविस्तर पंचनामा सहाय्यक पोलीस निरीक्षक रकमजी यांनी केला आहे. 

                दोन्ही छाप्यात एकूण आठ ड्रम मध्ये १६०० लिटर गुळ नवसागर मिश्रित वश गैरकायदा गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या उपयोगाचा किंमत सुमारे ४८ हजार   रुपये प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल प्रोव्हिशन गुन्ह्यापासून आपला बचाव होण्याच्या दृष्टीने  लपवून ठेवलेला मिळून आला म्हणून  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(एफ) नुसार मंगळवारी शहापूर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव करीत आहेत. 

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com