त्यामुळे वाचकांचे वृत्तपत्रांशी असलेले नातेे अधिकच घट्ट झाले
मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाचकांचे वृत्तपत्रांशी असलेले नातेे अधिकच घट्ट झाले असल्याचे एका राष्ट्रीय सर्वेक्षणात दिसून आले आहे. वृत्तपत्राची विश्वासार्हते यामुळे अधिकच वाढली असल्याचे दिसत आहे. अॅडव्हान्स फील्ड अँड ब्रँड साेल्युशन्स एलएलपीने लाॅकडाऊनमध्ये वाचकांच्या वृत्तपत्र वाचण्याच्या सवयीबाबत राज्यनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार देशभरात जवळपास ३८ टक्के वाचक राेज एक तासापेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचनासाठी देत आहेत. लाॅकडाऊनच्या अगाेदर या वाचकांचे प्रमाण १६ % हाेते.
१३ एप्रिल ते १६ एप्रिल या काळात दूरध्वनीवरून विविध राज्यांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले. त्यावरून वाचकांच्या वृत्तपत्र वाचण्याच्या पद्धतीतच केवळ बदल झालेला नाही तर, ते वाचण्याच्या वेळेतही बदल झाल्याचे आढळून आले. उदाहरणार्थ लाॅकडाऊनच्या आधी ४२ % वाचक ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च करत हाेते. आता ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वृत्तपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण ७२ % झाले आहे. १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ वृत्तपत्रे वाचणाऱ्या वाचकांचे प्रमाण केवळ ३ % असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. लाॅकडाऊनच्या अगाेदर हे प्रमाण १४ % हाेते.
0 टिप्पण्या