महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील केवळ भारताच्या नव्हे तर विश्वाच्या प्रमुख राजकीय, सामाजिक नेत्यांपैकी एक नेते होते. तसेच ते या शतकातील काही प्रमुख विचारवंतांपैकी एक प्रखर विचारवंतही होते. समाजसुधारणा संबंधी त्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक ठरत आहेत. स्वांतत्रपूर्व भारतात स्वातंत्र्याची चळवळ कोणत्या दिशेने जावी आणि स्वातंत्र्योत्तर भारताची समाजव्यवस्था कोणत्या मूल्यांवर उभी असावी, स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी या संबंधीची दृष्टी देणारे महत्त्वाचे कार्य; स्वतंत्र भारतात सामान्य कामगाराचे प्रश्न कसे सुटतील; भारतासमोरील भाषिक प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रश्न कसे सोडवावे या संबंधीची मते व्यक्त करणारे कामगार नेते; एक राष्ट्रनिर्माते म्हणून बाबासाहेबांनी केलेली कामे अशा अनेक अंगाद्वारे बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे दर्शन समस्त भारतीयांनाच नव्हे तर जगातील विद्वानांना घडते. म्हणूनच कोंलबो विद्यापिठाने बाबासाहेबांना सर्वोच्च सन्मान दिला.
अशा परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सर्वांना आनंदाची एक पर्वणीच असते.
या आनंदात आपण प्रत्येकाला सामावून घेऊ या...
आपला आनंद द्विगुणीत करू या...
आपला आनंद व्यक्त करू या... शुभेच्छाच्या रुपाने...
0 टिप्पण्या