Top Post Ad

लॉकडाउन वाढण्याच्या बातमीने शेअर बाजारात घसरण

लॉकडाउन वाढण्याच्या बातमीने शेअर बाजारात घसरण


  मुंबई


मागील आठवड्यात चांगला परफॉर्मन्स दाखवणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने सोमवारी मात्र फारशी चांगली कामगिरी केली नाही. सेन्सेक्स 1.5 टक्क्यांनी ओआणि ४६९ अंकांनी गडगडला तर एनएसईमध्ये निफ्टी ५०देखील १.३% नी घसरला व ९ हजार अंकांवर थांबला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन वाढले असताना तसेच देशांतर्गत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मार्केटचा कलही प्रभावित होत असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी व्यक्त केले.


बीएसईचे ३० स्टॉक बेंचमार्क निर्देशांकात आज फक्त ७ स्टॉक्समध्ये प्रगती झाली. यात एलअँडटी, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचा समावेश आहे. भारती एअरटेल आणि एशियन पेंट्ससारख्या स्टॉक्सनी नुकत्याच झालेल्या सुधारणेनंतर अनुक्रमे ४.६४% आणि १.६३% ची वाढ घेतली. निफ्टी ५० मध्ये २० शेअर्समध्ये प्रगती तर ३० शेअर्समध्ये घसरण दिसून आली. उपरोक्त शेअर्सव्यतिरिक्त हिंडाल्को इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स एसईझेड आणि कोल इंडिया यांनी आज वाढ अनुभवली. डॉ. रेड्डीज लॅबदेखील ३.८२%च्या वृद्धीच्या मार्गावर होती. मार्च महिन्यातील नीचांकीच्या तुलनेत हा स्टॉक ४०%हून अधिक आहे.


सध्या फार्मा सेक्टर आणि कॅपिटल गुड्सचे क्षेत्र हे गुंतवणूकदारांसाठी बाजी लावण्याकरिता उत्तम समजले जात आहे. फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर कंपन्यांनी सकारात्मक चिन्हे दर्शवली असून भविष्यातही अशाच स्थितीची अपेक्षा आहे. आपल्या देशात लॉकडाउन आताच संपणार नाही, त्यामुळे कॅपिटल गुड्स हादेखील उत्तम पर्याय असून निर्बंध उठवल्यानंतर उत्पादक उत्पादनात वाढ करतील, अशी आशा श्री अमर देव सिंह यांनी व्यक्त केली. अर्थात लॉकडाउन कशाप्रकारे शिथिल केले जाईल, ते या महिन्यापर्यंत संपेल का, यावर हे सर्व अवलंबून आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com