Top Post Ad

समता विचार प्रसारक संस्थेचा मदतीचा हात

लाॅक डाऊन मुळे घरातली चूल पेटणे अवघड झालेल्यांना, समता विचार प्रसारक संस्थेचा मदतीचा हात!ठाणे 


लोकांचं जीवन व रोजचं जगणं हे हातावर असतं. ह्यांनी आज कमावलं तर रात्रीच जेवण होतं, अशी परिस्थिती रोजंदारीवर राबणारे कचरावेचक, रिक्षा चालक, हमाल. पेंटर, सफाई कामगार, घरेलू कामगार, कपड्याच्या, व अन्य दुकानात काम करणारे विविध क्षेत्रातील असुरक्षित 
कष्टकरी ह्या महासंकटात सापडले आहेत. ह्यांचं घर कसं चालायचं, हा मोठाच प्रश्न आहे. ज्या लोकांचं जगणं त्यांच्या हातावर आहे. पण लॉकडाऊन मुळे - कोरोना साथी मुळे त्यांना रोजगार मिळत नाही. कुठेही जाता येत नाही. घरीच बसून आहेत. अशा लोकांना समता विचार प्रसारक संस्थेने तेजस्विता प्रतिष्ठान, म्युज फाऊंडेशन व श्रमिक जनता संघच्या सहकार्याने मदतीचा हात पुढे केला आहे।
संस्थेतर्फे २ व ३ एप्रिल रोजी दोन टप्प्यात ठाण्यातील कळवा पश्चिम व पूर्व, मानपाडा, पातलीपाडा, आझाद नगर, ज्ञानेश्वर नगर, कोपरी आणि वर्तकनगर आदी भागातील आता पर्यंत सुमारे १४८ गरजू परिवारांना जीवनावश्यक किराणा वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. यात ५ किलो गहु पीठ, ५ किलो तांदूळ, एक किलो तूरडाळ, तेल, हळद, मीठ, साबण आदी दैनंदिन गरजेचे सामान होते.पुढील हफ्त्यात इतर वस्त्यांमध्ये देखिल शिधावाटप करण्याचा ही संस्थेचा निर्धार आहे. प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंत ह्या वस्तू वाटप करण्यासाठी, संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संस्थेचे हितचिंतक शिवाजी पवार, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया व संजय मं. गो. आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या लतिका सु. मो. व हर्षलता कदम मॅडम यांचं या कामात मोलाचं सहकार्य केले आहे.


 


जर आपल्याला या मानवतेच्या कामात काही वस्तू किंवा आर्थिक मदत करायची असल्यास समता विचार प्रसारक संस्थेच्या खालील बॅन्क अकाउंटमध्ये ऑनलाईन देणग्या बँक ट्रान्सफरने पाठवण्यासाठी बँक तपशील पुढीलप्रमाणे.


Title of Bank Account : Samata Vichar Prasarak Sanstha
Bank's Name : Thane Bharat Sahakari Bank Limited
Branch : Chenadani Koliwada, Thane 
Account No.: 006115000000958 , IFSC: TBSB0000006


पैसे ट्रान्स्फर झाल्यावर कृपया 9869984803 या नंबरवर व्हाट्स अॅप किंवा साध्या मेसेजने, देणगीदाराचे नाव, पत्ता व रक्कम अवश्य कळवा. लाॅकडाऊन संपल्यावर देणगीदारांना देणगीच्या पावत्या पोहोचवण्यात येतील. 
अधिक माहितीसाठी संजय मंगला गोपाळ - 9869984803, जगदीश खैरालिया - 8104471652, 
हर्षलता कदम – 9967657128, सुनील दिवेकर – 9920181105.


या क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com