Top Post Ad

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, आमदारांच्या पगारात कपात, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता


आमदारांच्या पगारात कपात


मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय



मुंबई. 


राज्यात आमदारांना मासिक २ लाख ३२ हजार रुपये पगार मिळतो. व्यवसाय कर व आयकर कापून उर्वरित रक्कम आमदारांना मिळते. ३०% कपातीनंतर आता आमदारांच्या पगारात ७० हजारांची कपात होईल. त्यांना दरमहा १ लाख ६२ हजार रुपये पगार मिळेल. त्यांना मार्चमध्ये ४०% पगार मिळाला. उर्वरित ६०% रक्कम पुढील पगारात दिली जाईल. काही दिवसांपूर्वी आमदारांच्या वेतनात कपात करण्याचा घेतलेला निर्णय काही कारणांमुळे स्थगित करण्यात आला होता, परंतु गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्व खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात आणि खासदार निधी २ वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. खरे तर महाराष्ट्राने केंद्राच्या आधीच २ टप्प्यांत वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात गुरुवारी बदल करत आता एप्रिल २०२१ पर्यंत राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात केली जाणार आहे.
 दरम्यान राज्यात कोरोनाचे संकट वाढत असताना आता लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असून यावरही या बैठकीत सर्वच मंत्र्यांचे एकमत झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्याचा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही, त्या जिल्ह्यांना लॉकडाउनमधून वगळावे, असा सूर मंत्रिमंडळाच्या आधीच्या बैठकीत व्यक्त झाला होता. मात्र गेल्या चार दिवसांत मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच नव्याने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन १४ एप्रिलला संपेल, अशी शक्यता संपुष्टात आली आहे. लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय ११ एप्रिलला होईल, अशी शक्यता आहे.  


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com