Top Post Ad

'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...

'आंबेडकरवाद' समजून घेण्याची गरज...

 'आंबेडकरवाद' कशाला म्हटले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. बहुजन समाजातील लोकांच्याकडे ही बेसिक माहिती नसल्याने सुद्धा कोणाला 'आंबेडकरवादी' म्हणायचे या बद्दल संभ्रम आहे. हा संभ्रम पहिल्यांदा दूर केला तरच इमानदार लोकांना आपण समजावून सांगू शकतो. मेश्राम यांच्या दृष्टीकोण नावाच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आंबेडकरवादाची ढोबळ व्याख्या करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

प्रसंग पहीला :

सोलापूरच्या मातंग जातीच्या लोकांनी डिसेंबर १९३७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरले.

एका फ्लॅटफॉर्मवर महार जातीचे लोक व दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर मातंग जातीचे लोक बाबासाहेबांना घ्यायला आले होते.

महार जातीच्या लोकांचे म्हणणे होते की तुम्ही आमच्या जातीचे असल्याने अगोदर आमच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे.

मातंग जातीच्या लोकांचे म्हणणे होते की तुमचा (बाबासाहेबांचा) कार्यक्रम आम्ही आयोजित केला असल्याने आमच्या बरोबर आले पाहिजे.

महार जातीच्या लोकांना बाबासाहेबांनी तारीख व कार्यक्रम दिला नव्हता पण तरीसुद्धा महार जातीच्या लोकांनी जातीय मानसिकतेतून बाबासाहेबांच्याकडे आग्रह धरला होता.

बाबासाहेबांच्या समोर पेच निर्माण झाला होता.

महार जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अगोदर गेलो तर जातीयतेचा आरोप होऊ शकला असता व मातंग जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या व पूर्वनियोजित असलेल्या कार्यक्रमास गेलो तर जाती बहिष्कृत होण्याचा धोका होता. त्याकाळी जाती बहिष्कृत होणे म्हणजे सर्वात मोठी शिक्षा होती. हा धोका पत्करून बाबासाहेब मातंग जातीच्या लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेले.

प्रसंग दुसरा :

बुद्धभूषण प्रेसमधील आर्थिक घोटाळ्याची माहिती जेंव्हा बाबासाहेबांना समजली त्यावेळी त्यांनी दिल्लीवरून २३ फेब्रुवारी १९५६ रोजी भैय्यासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिल.

हे पत्र मा. प्रकाश आंबेडकर सदस्य असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या समितीने प्रकाशित केल आहे.

त्या पत्रातील महत्वपूर्ण दोन ओळी मी इथे देत आहे.

...मी तुला सूचित करत आहे की ही प्रेस सार्वजनिक संपत्ती आहे , ती तुझीही नाही व माझीही नाही आणि कोण्या एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक संपत्तीची अफरातफर करण्यास परवानगी देणे शक्य नाही....

याच पत्रात बाबासाहेब पुढे भैय्यासाहेबांना खटला भरण्याचा इशाराही देतात.

(हा प्रसंग इथे सांगण्याचा हेतू भैय्यासाहेबांना कमी लेखण्याचा नाही व तसेच असेल तर याचा दोष मा. प्रकाश आंबेडकर यांनाही घ्यावा लागेल.)

या दोन प्रसंगांतून बाबासाहेबांची जी जाती व व्यक्ती निरपेक्षता दिसते तो 'आंबेडकरवाद' आहे.

बाबासाहेब समता , स्वतंत्रता , बंधुता व न्याय हे तत्वज्ञान फक्त मानत नव्हते तर प्रस्थापित करण्यासाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते हा 'आंबेडकरवाद' आहे.

त्यांच जीवन हे खुल पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातील प्रत्येक ओळ न ओळ म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

त्यांनी केलेल लिखाण म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

ब्राह्मणांनी बहुजन समाजाला ज्या सहा हजार जातीत विभागले त्या सहा हजार जातींना जोडून राष्ट्रव्यापी आंदोलन तयार करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

समता , स्वतंत्रता , बंधुता व न्याय या गोष्टी केवळ मानणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर त्या प्रस्थापित करण्यासाठी निरंतर संघर्ष करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.
बाबासाहेबांनी जे सिद्धांत मांडले त्यावर अढळ निष्ठा ठेवणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

समाजाच्या संकट काळात सिध्दांतासाठी जीवाची बाजी लावून काम करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

अन्यायी व्यवस्थेच्या समर्थकांना खुले आवाहन देणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

ब्राह्मण धर्म , ब्राह्मणवाद, गांधीवाद , मार्क्सवाद आणि ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी नाकारल्या त्या त्या सर्व गोष्टी नाकारणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

बाबासाहेबांनी जे उद्दिष्ट दिले ते पुर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संघटन बनवणे, त्यासाठी रणनीती बनवणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

कपाळावर नीळ लावून फक्त जयभीम म्हणणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही.

14 एप्रिल दिवशी DJ लावून जयंती साजरी करणं म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही.

बुद्ध पौर्णिमा, विजयादशमी, सहा डिसेंबरला एकत्र येऊन त्रिशरण पंचशील म्हणणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर एकत्र येवून कामाची समीक्षा करणे , रिजल्ट काढणे म्हणजे आंबेडकरवाद आहे.

अन्याय झाल्यावर त्याकाळात आंदोलन करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' नाही तर अन्याय होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघर्ष करणे म्हणजे 'आंबेडकरवाद' आहे.

(फेसबुकवरील स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणारे ग्रुप एक तर माझ्या पोस्ट अप्रुव्ह करत नाहीत व केल्यातरी लगेचच डिलीट करत आहेत. लोकांच्या पर्यंत माहिती जाऊ नये असा ब्राह्मणांसारखाच वाईट हेतू काही फेसबुक पेज चालकांचा यातून दिसुन येत आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते, हितचिंतकांनी या पोस्ट सहीत पुढील पोस्ट फक्त शेअर न करता आपल्याल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येकाला कॉपी पेस्ट करून फेसबुकवर व व्हाट्सएपवर व्हायरल करायला सांगायच्या आहेत.
हे पुढील चार पाच दिवस फिल्ड वर्क समजून घरी बसून करायचे आहे.)

रविकांत मेश्राम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com