Trending

6/recent/ticker-posts

आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण पूर्ण

युनियन बँक बनली भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक


 आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण पूर्ण मुंबई


युनियन बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीची आंध्र बँक व पूर्वीची कॉर्पोरेशन बँक या सर्व मिळून आता एकच बँक अस्तित्वात असेल. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे सर्व कर्मचारी, ग्राहक आणि शाखा आजपासून युनियन बँकेच्या समूहाचा भाग असतील. या प्रक्रियेमुळे निर्माण होणारे अडथळे कमी व्हावेत, यासाठी ग्राहकांचे पूर्वीचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड्स, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट-मोबाइल बँकिंग पोर्टल आणि लॉगइन क्रिडेन्शिअल्स आधीसारखेच असतील.


युनियन बँक आता १२० दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांना ९५०० पेक्षा जास्त शाखा आणि १३,५०० पेक्षा जास्त एटीएममध्ये विविध प्रकारची उत्पादने आणि सेवा पुरवू शकेल. एकत्र झाल्यानंतर हे भारतातील सर्वात मोठे चौथे बँकिंग नेटवर्क असून सार्वजनिक क्षेत्रातील ही पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरली आहे. या एकत्रिकरणामुळे पुढील तीन वर्षात २५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा महसूल निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.


युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि सीईओ राजकिरण राय म्हणाले, ‘‘एकत्रीकरणाच्या माध्यमातून आम्ही आता ग्राहकांना अधिक शाखा, एटीएम, डिजिटल सर्व्हिसेस आणि क्रेडिट सुविधा पुरवणार असून आता आम्ही बँक या नात्याने अधिक मजबूत स्थितीत आहोत.’


या तिन्ही बँकांच्या ग्राहकांना आता युनियन बँकेच्या विस्तृत नेटवर्क आणि विना अडथळा सेवांचा लाभ मिळेल. आजपासून रोख रक्कम काढणे आणि टाकणे, बॅलेन्सची चौकशी आणि फंड ट्रान्सफर या मूलभूत सेवा एकाच नेटवर्कमध्ये सक्षमपणे पार पाडता येतील. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या ग्राहकांना युनियन बँकेचे एटीएम तसेच इतर सेवा वापरताना अतिरिक्त शुल्क लावले जाणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या