Top Post Ad

महात्मा फुले आमचे  कोण लागतात

महात्मा फुले आमचे  कोण लागतात 
 
◆ दिवाकर शेजवळ ◆
 
 
वर्ण आणि जाती ही शोषण करणारी व्यवस्था आहे। ती नामशेषच झाली पाहिजे, अशी भूमिका देशात सर्वात आधी घेऊन त्या विरोधात बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारी समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले।
 
मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांची पात्रता ठरवण्याचे साधन नव्हते। त्या काळात न्यायालयात लेखनिकाची नोकरी मिळवलेले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी उत्तीर्ण केलेली परीक्षा ज्योतिबा फुलेही उत्तीर्ण झालेले होते। तरीही टिळक, आगरकर, गोखले,कर्वे, यांच्या आधीच्या पहिल्या श्रेणीतील नेत्यांमध्ये सरकारी नोकरी न स्वीकारता सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे फुले हेच पहिले। 
 
मराठी भाषेचे 'शिवाजी' म्हटले गेलेल्या चिपळूणकर यांनी ज्योतिबा फुले यांची शूद्र जगतगुरु, शूद्र कवी, शूद्र धर्म संस्थापक अशी संभावना केली होती। फुले यांनी ज्या काळात इथल्या व्यवस्थेविरोधात बंड केले, त्यावेळचा सनातन्यांचा विरोध, प्रतिकुलता लक्षात घेता फुले यांच्या धैर्याला आणि संघर्षाला भावी पिढ्या यापुढेही अनेक शतके सॅल्युट ठोकतील, यात तिळमात्र शंका नाही।
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा महात्मा फुले यांच्या निर्वाणानंतर एक वर्षाने झालेला। पण बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यावर समता संगर पेटवावे ते 1927 सालात म्हणजे फुले यांच्या जन्म शताब्दी वर्षात हा विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे। बाबासाहेबांनी   बुद्ध, कबीर आणि फुले यांना गुरू मानले। त्या तिघांपैकी कोणालाही त्यांनी पाहिले नव्हते। संत कबीर, संत रविदास हे 14 व्या - 15 व्या शतकातील होते। पण बाबासाहेबांनी त्या दोघा महान संतांना आपले ग्रँथ अर्पण केले आहेत। अन त्यांनी धम्म स्वीकारला, तो बुद्धानंतर अडीच हजार वर्षांनी। याचा अर्थ एकच की, आपल्या पूर्वसूरींना बाबासाहेबांच्या भाव विश्वात अढळ स्थान होते। त्यांनी आपले वैचारिक अनुबंध त्यांच्याशी जोडले होते, जपले होते। ते कोणी कसे तोडू शकेल?
 
बाबासाहेबांनी गुरू मानलेल्या बुद्ध, कबीर, फुले यांच्यातील महात्मा फुले यांची आज जयंती।
 
गांधीजींनीही फुले यांना उगाचच ' खरा महात्मा ' म्हटले नव्हते!
 
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com