Top Post Ad

 पंतप्रधान देशाला 'एप्रिल फूल' बनवित आहेत - उर्जा मंत्री






 पंतप्रधान देशाला 'एप्रिल फूल' बनवित आहेत - उर्जा मंत्री

 


 





नागपूर:

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ मिनिटे दिवे बंद करण्याचे केलेले आवाहन घातक असून, त्यामुळे वीजनिर्मिती बंद पडू शकते ' असा दावा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान देशाला 'एप्रिल फूल' बनवित आहेत. कुणीही दिवे बंद करू नये, असेही ते म्हणाले.  मोदींच्या घोषणेवर राऊत म्हणाले की, एकाच वेळी सगळ्यांनी दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊ देशातील सर्व वीजनिर्मिती केंद्रे बंद पडतील. मोठे नुकसान होऊ शकेल. पुन्हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक तास लागतील. लोकांनी या आवाहनास प्रतिसाद देऊ नये. करोनासारख्या प्रादुर्भावाशी लढताना ते वैज्ञानिक भूमिका घेत नसून दिवे लावण्याचे आवाहन करीत आहेत, हे अयोग्य आहे. करोनाच्या काळातला हा अयोग्य इव्हेन्ट असल्याची टीका त्यांनी केली आहे.

------------------------------- 


 


घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा


येत्या पाच तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी लाईट घालवा आणि दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं जरा वेगळं आहे. लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा.



आणि जे आपल्या राज्यातील लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त १०१ रुपये द्या. फक्त १०१ रुपये. (अन त्याचा स्टेट्स आपल्या व्हाॅट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा)


लक्षात ठेवा मित्रांनो, अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत.
उजेडात होते ते पुण्य, अन अंधारात होत ते पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची कोणास संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा! अन ते पुण्याच काम करायच आहे आपल्या राज्यातील आपल्यासाठी आहोरात्र झटणा-या व्यक्तींसाठी...! सो लक्षात ठेवा १०१ रुपयांच आपल मुख्यमंत्री साहाय्यता कक्षात दान देऊन या सर्व लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहुयात!!!


सोबत- मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे बॅंक डिटेल्स


Chief Minister's Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720


State Bank of India, Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300


➡️ Google pay मध्ये maharashtra government म्हणून एक ऑप्शन आहे तिथूनही करू शकता !


जमले तर कमेन्ट बॉक्स मध्ये मदत केल्याचा स्क्रीन शॉट टाकावा, म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळेल)




 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com